विलास नवघरे
गिरड,
Girad-Tiger : गिरड खुर्सापार परिसरात एक वाघीण तिचे तिनं बच्छडे व एक वाघ अश्या ५ वाघांनी शेतीशिरात मुत संचार सुरू केल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये चांगली दहशत निर्माण केली आहे. यातील एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी वनविभागाला मिळाली आहे. उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात १३ सप्टेंबरपासुन ५० च्यावर अधिकारी कर्मचारी या वाघाच्या मार्गावर असून दिवसरात्र त्याला जेरबंद करण्यासाठी युद्धात पातळीवर प्रयत्न करीत आहेत.

गिरड परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासुन वाघाचया परिवाराने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. अनेक जनावरांचा या वाघांनी फडशा पाडला आहे. आतापर्यंत या वाघाला जेरबंद करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ३ जनावरांचे भक्षण केले आहे. भर पावसात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी संपूर्ण खुर्सापार जंगल पिंजून काढला आहे. अधूनमधून येत असलेला पाऊस या वाघाला रक्षण देत आहे. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी ट्रॅप व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. मात्र, रोज सुरू असलेल्या पावसामुळे जंगल परिसरात वाहन चालवण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे जेव्हापासून या वाघाला जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा पासून १ वाघ १ वाघीण व तिच्या तीन बछड्याचा शेत शिवारात मुत संचार कमी झाली आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी ५० पेक्षा जास्त वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी गिरडमध्ये तळ ठोकून आहेत. या वाघाला जेरबंद करणारच असा निर्धारित वनविभागाच्या वतीने करण्यात आला असता तर देखील हा वाघ मात्र त्यांना आतापर्यंत हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे.