सिंदी (रेल्वे),
Wardha-wet drought : मागील दीड महिन्यात मुसळधार पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. सरकार आता कशाची वाट बघत आहे, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकर्यांना आर्थिक मदत देणे सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा दिग्रजचे प्रगतशील शेतकरी राजू दांडेकर यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या अतिवृष्टी व पूरपरिस्थिती बघता शेतकर्यांच्या कुटुंबावर भयानक संकट आले आहे. सदर परिस्थिती शासनाने वेळीच सावरली नाही तर शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येईल. अनेक शेतकरी आत्महत्येला बळी पडतील, अशी भीती व्यत केली जात आहे. महसूल विभागाने तातडीने शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकर्यांना मदत करावी, जेणेकरून सणासुदीच्या काळात शेतकर्यांच्या घरची चूल पेटेल!
आधी पावसात खंड, नंतर सततची अतिवृष्टी आणि त्यातच बुरशीजन्य रोगाने पिकावर केलेल्या आक्रमणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर जून महिन्याच्या प्रारंभीच पावसाने हुलकावणी दिली. आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाल्यानंतर लागवड आणि पेरणी करता आली. दीड महिन्यात अतिवृष्टी झाली. वादळी वार्यासह मुसळधार पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतात अद्यापही पाणी साचले आहे.
दरम्यान, वातावरणातील बदलामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अलीकडेच सोयाबीन पिकावर यलो मोझॅक आणि चारकोल रॉट रोगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. कपाशीच्या पिकात मोठी घट येण्याची शयता असल्यामुळे कापूस उत्पादक संकटात सापडला आहे. विद्यमान परिस्थितीत शेतकरी डबघााईस आला असून शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राजू दांडेकर, शालिग्राम ढोबळे, भीमराव फुलमाळी यांच्यासह अनेकांनी केली आहे.