अनिल कांबळे
नागपूर,
senior citizen harassment, मुलाचे पालनपाेषण करुन स्वतःच्या पायावर उभे केल्यामुळे आयुष्याच्या सायंकाळी मुलगा आणि सून आपल्याला सुखात ठेवतील, अशी सकारात्मक अपेक्षा अनेक जेष्ठांना असते. मात्र, मुलाचे लग्न झाले की वडिलांच्या आदेशाचे पालन करणारा मुलगाच हतबल असताे. घरात सुनेचे टाेमणे, अपमान, शिवीगाळ, मारहाण आणि धमकी देण्यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सुनेकडून मानसिक व शारीरिक त्रास असल्याच्या सर्वाधिक तक्रारी भराेसा सेलमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे उतारवयातही ज्येष्ठांच्या नशिबी हालअपेष्ठाच सहन कराव्या लागत असल्याचे सत्य समाेर आले आहे.
विपरित परिस्थितीतही संसार करीत मुलांना माेठे करण्यासाठी आईवडिल काबाडकष्ठ करतात. मुलांचे शिक्षण, नाेकèया, व्यवसाय थाटून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करतात. घरात आई-वडिलांच्या आज्ञेत वाढणाèया मुलांवर चांगले संस्कार करतात. घरातील कुटुंब प्रमुख म्हणून आई किंवा वडिल हे स्वतः उपाशी राहून कुटुंबातील सदस्यांचा भार वाहत असतात. मात्र, मुलाचे लग्न झाल्यानंतर घरात आलेल्या सूनेला काही दिवसांतच वृद्ध सासू-सासरे स्वतःच्या संसारात अडथळा ठरत असतात. घरातील जेष्ठांची ‘नसून अडचण असून खाेळंबा’ अशी स्थिती हाेते. सूनेच्या शब्दासमाेर मुलगासुद्धा हतबल हाेताे. त्यामुळे वयाच्या शेवटच्या टप्प्यात वृद्धांना अपमानजनक वागणूक आप्तस्वकीयांकडूनच मिळते. सून किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांकडून हाेणाèया अत्याचाराविरुद्ध गेल्या साडेचार वर्षांत 672 जेष्ठ नागरिकांनी भराेसा सेलमध्ये तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये 390 तक्रारी स्वतः जेष्ठांनी भराेसा सेलमध्ये जाऊन केल्या तर 285 तक्रारी हेल्पलाईन,फोन, पाेलिस नियंत्रण कक्षाला माहिती देऊन केल्या आहेत. या तक्रारींचे सकारात्मक निराकरण करण्याचे प्रमाण जवळपास 99 टक्के आहे.
सुनेकडून छळाच्या सर्वाधिक तक्रारी
हेल्पलाईन-ाेनवरुन जेष्ठांनी केलेल्या 285 तक्रारींमध्ये सुनेकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. 153 तक्रारींमध्ये सून, मुलगा, मुलीने अत्याचार केल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. नातेवाईककडून त्रास 27 आणि काैटुंबिक वादाच्या 11 तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारींमध्ये ज्येष्ठांना सुनेकडून मारहाण, शिवीगाळ, घरात राहण्यास मज्जाव आणि उपाशी ठेवण्यासह गंभीर तक्रारींचा समावेश आहे.
दामिनीची मदत
ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी दामिनी पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. दामिनींकडून वृद्धांच्या घरी भेटी देणे तसेच ाेन करुन विचारपूस करण्यात येते. वृद्धांना औषध मिळवून देण्यापासून वीजबिल भरुन देण्यापर्यंतची मदत पाेलिस पथक करतात. तक्रारींचे निराकरण केल्यानंतर दामिनी पथक पडताळणी करुन खातरजमा करुन घेतात. वृद्धांना मदत करण्यात दामिनीचा महत्वाचा वाटा आहे.
ज्येष्ठांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतल्या जाते. ज्येष्ठांसह मुलगा,मुलगी, सून आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचे तक्रारीबाबत समूपदेशन केल्या जाते. तक्रारींचे गांभीर्य ओळखून पाेलिस ठाण्यातून मदत घेतली जाते. भराेसा सेलकडे येणाèया प्रत्येक ज्येष्ठांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येते.
- सीमा सूर्वे, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, भराेसा सेल.