स्तोत्र समूह पठण स्पर्धा

२२ समूहांचा उत्साहपूर्ण सहभाग

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Agyaram Devi Temple नवरात्री निमित्त विहिंप मंदिर आयाम व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आग्याराम देवी मंदिर प्रांगणात स्तोत्र समूह पठण स्पर्धा उत्साहात पार पडली. विवाहित महिला, मुलींसह ट्रान्सजेंडर महिलांचाही सहभाग लक्षणीय ठरला.एकूण २२ समूह सहभागी झाले. उदयनगरच्या नादरंग समूहाने प्रथम क्रमांक पटकावला, तर स्वरनाद आणि विश्व मांगल्य सभा अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी राहिले. अंबिका, स्वरांजली व शिवमुद्रा समूहांना प्रोत्साहनपर पुरस्कार मिळाले.
 

trans 
 
 
विशेष म्हणजे शिवमुद्रा हा ट्रान्सजेंडर महिलांचा समूह असून त्यांच्या सहभागाने या स्पर्धेला वेगळे परिमाण लाभले. पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध मंदिर समित्यांचे पदाधिकारी, आयामाचे पदाधिकारी व परीक्षक उपस्थित होते.मृणालिनी वाघमारे आणि अशोक बांगरे यांनी परीक्षणाचे काम केले.Agyaram Devi Temple मृणालिनी वाघमारे यांनी निकाल घोषित केले . मंदिर आयामाच्या प्रांत महिला प्रमुख चैताली खटी यांनी स्पर्धेचे नियम समजून सांगितले .नागपूर महानगर महिला प्रमुख श्रद्धा पाठक यांनी प्रास्ताविक केले आणि सर्वांना मंदिर आयामाच्या कामात सहभाग होऊन मंदिराशी जोडण्याचे आवाहन केले. सारिका येवले यांनी कार्यक्रमाचे उत्तम संचालन केले तर तृप्ती आकांत यांनी आभार मानले.
सौजन्य:श्रद्धा पाठक ,संपर्क मित्र