यवतमाळचा आकाश थेट जपानमध्ये !

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
बासरीच्या सुरांनी जिंकणार परदेशी मनं
प्रवास गावाकडून जगाकडे : आकाशची सूरमयी भरारी
यवतमाळ, 
कलेला कुठलेही बंधन नसते, प्रतिभेला मार्ग काढण्यासाठी फक्त संघर्षाची गरज असते. यवतमाळच्या Akash Saitwal आकाश सैतवालने अगदी खरे करून दाखवले आहे. अत्यंत गरिबीत, साध्या परिस्थितीत वाढलेल्या या कलासाधकाने आज आपल्या कलेच्या जोरावर जपानसारख्या देशात सुरांची मैफल रंगवण्याचा मान मिळवला आहे. आकाशचे बालपण संघर्षमय होते. त्याचे वडील संजय पाटबंधारे विभागात असून आई जयश्री गृहिणी आहेत. संपूर्ण बालपण त्यांनी याच विभागाच्या घरामध्येच घालवले. घरात ना कुठलाही सांगितिक ना सांगितिक वातावरण, पण तरीही आकाशला संगीताची ओढ बालपणापासूनच होती.
 
 
Akash Saitwal
 
Akash Saitwal  आकाशचे शालेय शिक्षण विवेकानंद शाळेत झाले. पुढे दाते कॉलेज तसेच वाधवानी कॉलेजमध्ये त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच तो विविध स्पर्धांमध्येही सकि‘य राहिला. शालेय जीवनातच विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला, आपली कला सादर केली आणि प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य आकाशचा स्वभाव देखील सर्वांना आपलेसे करणारा आहे. साधेपणा, मैत्रीभाव, मेहनत घेण्याची तयारी आणि आई वडीलांचे संस्कार जोपासत लहान पणापासूनच इतरांना मदत करण्यासाठी तत्पर तो राहिला.
 
 
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आकाशने हे यश संपादन केले आहे. एवढ्या लहान वयात जागतिक पातळीवर आपली कला सादर करण्याचा मान मिळवणारा आकाश हा यवतमाळसाठीच नव्हे तर देशभरातील तरुणाईसाठी प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. संगीतातला खरा प्रवास मात्र मुंबईत सुरू झाला. तिथे त्याला पंडित पारसनाथजी यांच्याकडे बासरीचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आकाशने आपल्या सुरांना घासून-पुसून नवी दिशा दिली.
 
 
आज त्याच्यापुढे आयुष्याच्या नव्या दारांची उघडझाप सुरू आहे. कोणताही सांगितिक वारसा नसताना, फक्त स्वतःच्या आणि कलेच्या माधुर्यावर उभा राहिलेला हा कलाकार आता थेट जपान दौर्‍यावर निघाला आहे. हे यवतमाळच्या भूमीसाठी अभिमानाचे पाऊल आहे. Akash Saitwal  आकाश सैतवालची ही यशोगाथा केवळ संगीताची नाही, तर संघर्ष, जिद्द आणि कलेवरील निष्ठेची आहे. गरीबीतून झगडत आलेल्या आकाशने दाखवून दिले की, परिस्थिती कधीच अडथळा नसतो; खरा विश्वास, मेहनत आणि चिकाटी तर सूर जगभर दुमदुमतात.