नागपूर,
Antarasaleya gondhaḷa spardha स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ व बाल कला अकादमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी लीलाताई फडणवीस स्मृती आंतरशालेय जोगवा/गोंधळ/देवीचे भजन स्पर्धा महालमधील श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळेत घेण्यात आली. या स्पर्धेत जवळजवळ ११ शाळांचा होता. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस व ब्लूमिंग किड्सच्या संचालिका सीमा फडणवीस यांच्यातर्फे विजयी शाळेतील प्रत्येक शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
Antarasaleya gondhaḷa spardha प्रथम- न्यू इंग्लिश हायस्कूल महाल, द्वितीय- शाहूज गार्डन शाहूनगर, तृतीय क्रमांक - नारायणा विद्यालय चिचभवन, उत्तेजनार्थ प्रथम - सेवासदन हायस्कूल सीताबर्डी, उत्तेजनार्थ द्वितीय दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल. परीक्षण गोविंद गडीकर व अश्विनी काणे यांनी केले. उद्घाटनाला माजी आ. अनिल सोले, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, बाल कला अकादमीचे सचिव सुबोध आष्टीकर, बालकला अकादमीच्या सदस्य सीमा फडणवीस यांची उपस्थिती होती. राजेश सुलभेवार व इतरांनी कार्यक‘मासाठी परिश्रम घेतले.