बुलडाणा,
buldhana-urban-pant-sanstha-federation : महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले असुन मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी तसेच बुलढाणा जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी पाच लाख व एक लाख असा एकूण सहा लाखाचा मदत निधी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे दि. २६ सप्टेंबर रोजी सुपुर्द करण्यात आला.

यावर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले असुन संपुर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झालेले आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद व पुरग्रस्तांना मदतीचा हात म्हणुन बुलडाणा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटीच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा मदत निधीचा तसेच बुलढाणा जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने एक लाखाचा धनादेश डॉ. महेंद्र चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा यांचेकडे सुपुर्द करण्यात आला. या प्रसंगी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, संचालक गोपाल चिरानिया, नितिन सावजी, सरव्यवस्थापक कैलास कासट, लेखापाल मोहन दलाल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे, त्याआवाहनाला प्रतिसाद व पुरग्रस्तांना मदतीचा हात म्हणुन बुलडाणा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशच्याच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा मदत निधीचा धनादेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा डॉ. महेंद्र चव्हाण यांचेकडे सुपुर्द करण्यात आला.