वर्धा,
chitra wagh, जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती जयश्री गफाट यांनी आपल्या परिसरातील युवतींना गावातच नवरात्रोत्सावातील सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गरब्याचा आनंद लुटता यावा म्हणून श्रीरंग गरबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी हजेरी लावली. युवतींना मार्गदर्शन केले आणि थेट त्यांच्यामध्ये सहभागी होत गरब्याचा आनंद लुटला.
आंजी येथे भाजपा नेत्या जयश्री सुनील गफाट यांच्या पुढाकाराने नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शहरी भागापुरताच मर्यादित असलेला गरब्याचे ग्रामीण भागातही आकर्षण वाढू लागले आहे. त्यामुळे आंजी आणि परिसरातील युवतींच्या मनात आपण खेड्यातील अशी भावना निर्माण होऊ नये म्हणून आंजी येथे गरबा महोत्सव गेल्या काही वर्षांपासुन सुरू केला. त्यासाठी विशेषत: महिलांना पंधरा दिवसांपूर्वीपासून गरबाचे प्रशिक्षण दिले जाते.
यावर्षी गरबा उत्सवाचे उत्सवाचे उद्घाटन चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, अॅड. शितल भोयर, अर्चना वानखेडे, आयोजक जयश्री गफाट, विजय गोमासे, नंदू झोटिंग, गौरव गावंडे, राहुल चोपडा, दिलीप रघाटाटे, नितीन भावरकर, चेतना कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी chitra wagh चित्रा वाघ यांनी आपल्या सोबत देवाभाऊ खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. आंजी सारख्या गावात जयश्री गफाट यांनी शहराच्या तोडीचा गरबा महोत्सवाचे आयोजन केल्याचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या ग्रामीण भागातील महिलांबरोबर उत्साहात गरबा खेळत उपस्थितांचे मन जिंकले.ग्रामीण भागातल्या महिलांसाठी हे आयोजन विशेष आकर्षण ठरले असून या उपक्रमामुळे महिलांमध्ये सामाजिक सहभाग वाढत असल्याचे दिसून आले. यंदाचा गरबा उत्सव केवळ नृत्याचा नव्हे तर सामाजिक एकोप्याचा आणि ग्रामीण सशतीकरणाचा एक सोहळा ठरल्याची प्रतिक्रिया गावात उमटली. यशस्वीतेकरिता श्रीरंग गरबा उत्सव समिती सदस्य जयश्री गफाट, भारती गोमासे, वंदना बावणे, ग्रीष्मा रेवतकर, कविता गिरडकर, ज्योती गोमासे, सुषमा बावनकर, रुपाली राजूरकर, अर्चना जाधव यांनी परिश्रम घेतले. संचालन ज्योती भगत यांनी केले.