मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतील दीनदयाल जयंती समारोह सोमवारी

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे आयोजन
यवतमाळ, 
एकात्म दर्शन व अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन कार्यरत असलेल्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचा Deendayal Jayanti Samaroh दीनदयाल जयंती कार्यक‘म आता सोमवार, २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील यंदाचा हा कार्यक्रम रविवारी होणार होता. अपरिहार्य कारणास्तव त्यात बदल होऊन तो आता सोमवार, २९ सप्टेंबर रोजी ११ वाजता जांब रोडवर बोरी-तुळजापूर महामार्गालगतच्या हॉटेल वेनेशियन लॉनवर होईल.
 
 
Deendayal
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके व माजी राज्यमंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित राहतील. दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात पारधी अंत्योदय प्रकल्प, आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांना उभे करणारा स्वयंसिद्धा प्रकल्प, महिलांचे आरोग्य राखण्यास मदत करणारा किचन गार्डन प्रकल्प, कमी खर्चाच्या सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारा कृषी विकास प्रकल्प यासह विविध प्रकल्प चालविले जातात.
 
 
Deendayal Jayanti Samaroh त्यासाठी निळोण्यालगत दीनदयाल प्रबोधिनी, धनोडा येथील माहूरगड कृषी विकास प्रकल्प, नेर तालुक्यातील समृद्धी कृषी विकास प्रकल्प आणि वाशीम तोरणाळा येथे वत्सगुल्म कृषी विकास प्रकल्प चालवले जातात. शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण मार्गदर्शन व समुपदेशन तथा मदत करणार्‍या या प्रकल्पाचे काम बघण्यासाठी तसेच दीनदयालजींना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री यवतमाळात येत आहेत. या दौर्‍यात ते दीनदयाल प्रबोधिनीसह पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान येथील भव्य पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. वेनेशियन लॉन येथे सोमवार, सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित जाहीर कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने केले आहे.