नवी दिल्ली,
Sameer Wankhede अभिनेता शाहरुख खान याच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटसह नेटफ्लिक्स आणि इतर पक्षांविरुद्ध आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सुनावणीस नकार दिला आहे. ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबसीरीजमधील कथित बदनामीकारक आणि वानखेडे यांच्याशी साम्य असलेलं पात्र दाखवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी ही याचिका दाखल केली होती.
वानखेडे यांनी Sameer Wankhede मागणी केली होती की, या वेबसीरीजमध्ये दाखवलेलं पात्र खोटं, अपमानास्पद आणि त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारं असल्याने या सीरीजवर बंदी घालण्यात यावी. त्याचप्रमाणे, नुकसानभरपाई देण्यात यावी आणि संबंधित दृश्य सीरीजमधून हटवण्यात यावं. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेच्या ग्राह्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रकरणावर दिल्लीमध्ये सुनावणी का अपेक्षित आहे, याबाबत सविस्तर कारणं मांडण्यास सांगितलं.
न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान विचारलं, “हे प्रकरण मुंबईशी संबंधित असताना, याचिका दिल्ली उच्च न्यायालयात का दाखल केली गेली आहे? राष्ट्रीय राजधानीत कारवाईची अपेक्षा का व्यक्त केली जात आहे?” त्यांनी स्पष्ट केलं की, याचिकेत अधिकार क्षेत्राबाबत (jurisdiction) पुरेशी माहिती नसल्यामुळे कोर्ट त्यावर सध्या सुनावणी घेऊ शकत नाही.वानखेडे यांच्यावतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी यावेळी युक्तिवाद करत सांगितलं की, “ही वेबसीरीज संपूर्ण भारतात, विशेषतः दिल्लीतील प्रेक्षकांनाही पाहायला मिळते. त्यामुळे तिचा परिणाम दिल्लीतील प्रतिष्ठेवरही होत आहे.” मात्र, कोर्टाने या युक्तिवादावर समाधान व्यक्त न करता सांगितलं की, याचिकेत आवश्यक ती सुधारणा करून, दिल्ली उच्च न्यायालयात प्रकरण चालवता येईल अशा पद्धतीने कायदेशीर मुद्दे मांडावेत.
या याचिकेवर Sameer Wankhede सध्या कोणताही तातडीचा दिलासा न देता न्यायालयाने वानखेडे यांना त्यांचा अर्ज अधिक स्पष्ट आणि अधिकार क्षेत्राच्या आधारे योग्य ठरवण्यासाठी सुधारित स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही वेबसीरीज शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केली असून, ती १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. यातील एका पात्राचे चित्रण थेट वानखेडे यांच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळतेजुळते असल्याचा आरोप करत, त्यांनी याविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग निवडला आहे. परंतु, आता त्यांची याचिका कोणत्या न्यायालयात ग्राह्य धरली जाईल, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.दरम्यान, याप्रकरणातील पुढील पाऊल काय असेल, हे वानखेडे यांच्याकडून याचिकेत केलेल्या सुधारणा आणि न्यायालयाच्या पुढील आदेशांवर अवलंबून असेल.