७५ ग्रामस्थांना सनद, पट्ट्याचे प्रमाणपत्र वाटप

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
मंगरुळनाथ,
ghar yojana mangrulnath सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्य राज्य शासन राबवित असलेल्या सेवा पंधरवाडा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन पंचायत समिती मंगरूळनाथ यांच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते.
 

पारधी समाजाचा तहसील कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा    pardhi community reservation protest,   रिसोड,    pardhi community आदिवासी पारधी समाजाच्या वतीने अनुसूचीत जमातील आरक्षण बचाव मोर्चा आयोजन २६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. पारधी समाज हा आदिवासी असून, देखील वारंवार त्यांना आरक्षणातून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले जाते. शिक्षण, नोकरी व सामाजिक क्षेत्रात मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षण अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मोर्चाच्या शेवटी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.    सदर मोर्चाची सुरुवात रिसोड श 
 
 
यामध्ये सर्वांसाठी घरे या महत्वकांक्षी योजने अंतर्गत ग्रामस्थांना गावठाण क्षेत्रातील जमीन उपलब्ध करून देणे, सनद, पट्टे वाटप करणे, याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंगरूळनाथ तालुयातील ग्राम शेलूबाजार, गणेशपुर धोत्रा, कळंबा बोडखे, तर्‍हाळा, पिंपळखुटा संगम व वरुड बु. या गावातील ग्रामस्थांना पंतप्रधान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७५ व्यक्तींना सनद, पट्ट्याचे प्रमाणपत्र आ. श्याम खोडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, स्थापत्य अभियंता, कार्यालय अधीक्षक, विस्तार अधिकारी व पंचायत समिती मधील कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. पट्टे वाटपानंतर मात्र ग्रामस्थांना लवकरच घरकुलाचा लाभ प्राप्त होणार आहे, असे आ. श्याम खोडे याप्रसंगी बोलतांना म्हणाले.