अनंतपूर,
girl-falls-into-boiling-milk-anantapur आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बुक्करायसमुद्रम मंडलमधील कोरापाडुजवळील एका शाळेत १७ महिन्यांच्या अक्षिता नावाच्या चिमुकलीचे दुर्दैवी निधन झाले. ही घटना शाळेच्या स्वयंपाकघरात घडली जिथे तिने उकळत्या दुधाच्या मोठ्या पातेल्यात पडून गंभीर जखमी झाली होती. स्वयंपाकघरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात संपूर्ण घटना नोंदवली गेली आहे.

अक्षिताची आई कृष्णवेणी या शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. ती कामात व्यस्त असताना अक्षिता शाळेतच खेळत होती. खेळता-खेळता ती स्वयंपाकघरात गेली जिथे विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले खवळते दूध पंख्याखाली थंड होत होते. अक्षिता या दुधाच्या पातेल्याजवळ खेळत असताना, तिथे आलेल्या एका मांजराकडे पाहण्यासाठी ती मागे वळली आणि या गडबडीत दुर्दैवाने गरम दुधाच्या भांड्यात पडली. girl-falls-into-boiling-milk-anantapur दुधात पडताच ती भाजल्यामुळे ओरडू लागली, पण स्वतः बाहेर पडू शकली नाही. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून कृष्णवेणी धावत स्वयंपाकघरात पोहोचल्या आणि अक्षिताला गरम दुधातून बाहेर काढले. तिला तातडीने अनंतपूरच्या सरकारी रुग्णालयात नेले गेले, जिथे प्राथमिक उपचारानंतर तिला कुरनूल येथील सरकारी रुग्णालयात हलवण्याची शिफारस करण्यात आली. मात्र, अक्षिताचे जखम गंभीर असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सौजन्य : सोशल मीडिया