भविष्यातील प्रवासी भार कमी होणार
नागपूर,
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत गोधनी स्थानकाचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. Godhani railway station गोधनी रेल्वे स्थानकाचा सॅटेलाइट हब म्हणून विकास केल्या जात आहे. गोधनी हे नागपूरचे दुसरे महत्त्वाचे सॅटेलाइट केंद्र ठरणार असून रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाला गती दिली आहे. प्रवासी भार लक्षात घेता हे स्थानक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी अजनी रेल्वेस्थानकानंतर Godhani railway station गोधनी रेल्वे स्थानकाचे सॅटेलाइट हब म्हणून कार्यान्वित होईल. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत गोधनी स्थानकावर विविध विकास कामे सुरू आहेत. यामध्ये उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म, आधुनिक फूटओव्हर ब्रिज, लिफ्ट आणि एस्कलेटर उभारण्यात बुकिंग ऑफिसेसचे नूतनीकरण, बसण्याची उत्तम व्यवस्था, प्रकाश व हवेशीर सुविधा, स्वच्छता आणि डिजिटल प्रवासी माहिती व्यवस्था यावर भर दिला जाणार आहे.
मुख्य स्थानकावरील ताण कमी होणार
वन प्रॉडक्ट योजना व दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश सुविधाही उपलब्ध होणार आहेत. अजनी स्थानकानंतर Godhani railway station गोधणीचे सॅटेलाइट हबमध्ये रूपांतर झाल्यास नागपूर शहरातील रेल्वे प्रवास अधिक आणि सुसज्ज होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, नागपूर जंक्शनवरील ताण कमी करण्यासाठी दीर्घ पल्ल्याच्या गाड्या कळमना-गोधनी रेल्वे मार्गे वळविण्याचा प्रस्ताव आहे.