खामगाव,
sagardada fundkar गरोदर महिला यांच्यासह इतर सर्व महिलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी भाजपा तसेच सरकार तत्पर असून त्यांच्या आरोग्य साठी सतत विशेष आरोग्य शिबिरे ठिकठिकाणी राबवू असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया चे सहसंयोजक सागर दादा फुंडकर यांनी केले. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात महिलांच्या विविध आजारासंबंधी विशेष आरोग्य शिबिर राबविण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन सागरदादा फुंडकर यांचे शुभहस्ते करण्यात आले. या विशेष शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने महिलांनी घेतला व त्यांनी सागर दादा फुंडकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्ण महिलांची आत्मने विचारपूस करून तुम्हाला कोणत्याही शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास त्यांची सोय मोफत करून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांना यावेळी दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ निलेश टापरे यांच्यासह त्यांची वैद्यकीय. यांनी रुग्ण सेवा दिली.sagardada fundkar याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर पुरोहित, डॉ एकनाथ पाटील, भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार,महेंद्र रोहणकार, तालुकाध्यक्ष श्याम पाटेखेडे, सौं अनिता देशपांडे, राम मिश्रा, पवन गरड, गजानन मुळीक,सौं सौं शिवानी कुलकर्णी, सौं भाग्यश्री मानकर, सौं श्रद्धा धोरण, सौं भक्ती वाणी, सौं पूजा वऱ्हाडे, जितेंद्र पुरोहित, गणेश जाधव, गणेश सोनोने, अशोक हट्टेल, रमेश इंगळे, नगेंद्र रोहणकार, विजय उगले, विलास देशमूख, रवी गायगोळ, अमोल राठोड, गणेश कोमूकर, प्रकाश बारगळ, नंदू कांडेकर, शुभम देशमूख, सुरेश घाडगे, प्रसाद यदलाबादकर, गोलू आळशी, संजय भागदेवानी,आदित्य केडिया,भागवत वाघ,रुपेश शर्मा, गणेश गजघाने, मुकेश गावंडे,संदीप शेलकर, आदी भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. तत्पूर्वी सागरदादा फुंडकर व भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने सामान्य रुग्णालय परिसरात एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.