भारत-पाक अंतिम महामुकाबला 28 सप्टेंबरला

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
दुबई,
India-Pakistan Grand Final आशिया चषक स्पर्धेचा महासंग्राम आता ठरणार आहे. भारत आणि पाकिस्तान या चिरप्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रथमच अंतिम सामना रंगणार असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तानने करो या मरोच्या सामन्यात बांगलादेशवर 11 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता आणि आता दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत.
 
 
 
India-Pakistan Grand Final
भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित कामगिरी करत फायनल गाठली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ग्रुप स्टेज आणि सुपर फोर्समधील सर्व पाच सामने जिंकले. यूएई, ओमान, बांगलादेशसह पाकिस्तानलाही दोनदा धूळ चारत भारताने अपराजितपणे अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे सलमान आघाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने सहापैकी चार सामने जिंकले. त्यांनी ओमान, युएई, श्रीलंका आणि बांगलादेशला हरवून फायनलमध्ये धडक मारली आहे.
 
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे. रविवार, 28 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. टॉस साडेसात वाजता होईल. दोन्ही संघांकडे तुफान खेळाडू आहेत. भारताकडे अभिषेक शर्मा, शुबमन गिल, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, टिळक वर्मा, जसप्रीत बुमराह आणि रिंकू शर्मा यांसारखे दमदार खेळाडू असून पाकिस्तानकडे फखर जमान, India-Pakistan Grand Final साहिबजादा फरहान, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि हसन अलीसारखे अनुभवी खेळाडू आहेत. हेड-टू-हेड आकडेवारीनुसार भारताने पाकिस्तानविरुद्धच्या एकूण 15 T20 सामन्यांपैकी 12 जिंकले आहेत, तर पाकिस्तान फक्त 3 सामने जिंकू शकला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील हा ऐतिहासिक सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. तसेच सोनी LIV आणि फॅनकोड अॅप व वेबसाइटवर ऑनलाइनही हा सामना पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल. या महामुकाबल्याची आतुरता क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलीच वाढली आहे.