नागपूर,
IT Park Road दीपस्तंभ सामाजिक संस्था आणि आरोग्य भारती, नागपूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त मंदिर, आयटी पार्क रोड येथे ५१ विधवा निराधार महिलांची ओटी भरून नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.“स्त्री हीच देवीचे रूप” या भावनेतून महिलांना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमातून ग्रामीण भागातील महिलांनाही जोडले जात असून नवरात्र उत्सवभर विविध ठिकाणी निराधार महिलांना सन्मान देण्याचे कार्य सुरू आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रवींद्र क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.IT Park Road प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निशा भुसारी, डॉ. सुरेखा वानखेडे, डॉ. मुरलीधर इढोळे, अमित सिब्बल, प्रा. किशोर फिरके, यवनलाल चौधरी, विनोद मेहरे, वर्षा मानकर, सपना रोडी उपस्थित होते.प्रास्ताविक व संचालन नंदकिशोर मानकर यांनी केले तर आभार लक्ष्मी विजयवार यांनी मानले.
सौजन्य:स्मिता बोकारे,संपर्क मित्र