‘Jija Mata Vidwat Gaurav Award’ छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा ‘जिजामाता विद्वत गौरव’ पुरस्कार यंदा यवतमाळचे संदीप शिंदे यांना झाला असून शनिवारी ४ ऑक्टोबरला लक्ष्मीनगर आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात संध्याकाळी ६ वाजता आयोजित कार्यक्रमात तो प्रदान केला जाईल. या पुरस्काराचे ५१ हजार रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी भोसले राजघराण्याचे श्रीमंत डॉ. मुधोजी राजे भोसले राहणार असणार असून प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव देशमुख कृषी माजी कुलगुरू व सुप्रसिद्ध कृषितज्ज्ञ शरद निंबाळकर यांची उपस्थिती राहील.
छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे द्वारे गेल्या ४२ वर्षांपासून (अखंडितपणे) धर्म, संस्कृती व इतिहास यापैकी कुठल्याही क्षेत्रात व्रतस्थ जीवन जगून कार्य करणार्या महनीय व्यक्तींना ‘Jija Mata Vidwat Gaurav Award’ ‘जिजामाता विद्वत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार यवतमाळच्या नंददीप फाऊंडेशनचे संस्थापक व संदीप शिंदे यांना प्रदान केला जाईल. आतापर्यंत भालजी पेंढारकर, शाहीर योगेश, अपणार्र् रामतीर्थकर, भारतरत्न लता मंगेशकर अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक‘माला सर्वांनी मोठ्या सं‘येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.