बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची निघृण हत्या

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
बीड,
Journalist's son brutally murdered in Beed बीड शहरात एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरवून टाकला आहे. स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा, २२ वर्षीय यश देवेंद्र ढाका, काल रात्री माने कॉम्प्लेक्स परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला. माहिती नुसार, यश आणि त्याचा मित्र सुरज काटे यांच्यात वाढदिवसाच्या साजरीकरणादरम्यान पूर्वीचून वैर होता, आणि त्याच वैरातून सुरजने यशच्या छातीत धारदार शस्त्राने दोन वार केले. या छातीत झालेल्या आरपार वारांमुळे यश रक्तबंबाळ झाला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
 
Journalist
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सुरजला ताब्यात घेतले असून, सीसीटीव्ही तपासाद्वारे या हत्येत इतरांचा सहभाग होता की नाही, याचा शोध सुरू आहे. यश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता आणि बीड शहरातील स्थानिक वर्तपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा असल्याने या घटनेने स्थानिक समाजात मोठी खळबळ निर्माण केली आहे.
 
 
प्राप्त माहितीनुसार, महिनाभरापूर्वीही यश आणि सुरज यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जाते. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात तणाव वाढल्यावर सुरजने चाकू काढून थेट यशच्या छातीत वार केले. या घटनेनंतर यशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र जीव वाचवता आला नाही. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केला आहे. ही घटना बीड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रकाश टाकते.