मानोरा,
farmers loan waiver demand संपूर्ण मानोरा तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून शेतकर्यांचे कर्ज माफ करा, अशा मागणी चे निवेदन मानोरा तालुका दुष्काळग्रस्त संघर्ष समितीने तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना देण्यात आले. सदर निवेदन तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई यांना सुद्धा पाठविण्यात आले.
निवेदनानुसार तालुयात सातत्याने पाऊस सुरू आहे. नैसर्गिक बदलामुळे पाऊस कुठे पडतो कुठे नाही. त्यामुळे मंडळ निहाय पावसाच्या नोंदी ह्या योग्य पद्धतीने मिळत नाही. शेतकर्यांना नुकसान भरपाई नुकसान होऊन सुद्धा मिळत नाही. आज घडीला जर पाहिले तर पावसामुळे प्रचंड शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. करिता शासनाने मानोरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्याचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करण्यात यावे व शेतकर्याला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देतेवेळी माजी जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, बाजार समिती सभापती डॅ. संजय रोठे, जिनींग चे अध्यक्ष अभिजीत पाटील, पप्पुशेठ हेडा, इफ्तेखार पटेल, यशवंत इंगळे, राजू गुल्हाने, भुजंगराव राठोड, गोपाल भोयर, अरविंद राऊत, सचिन रोकडे, विक्रांत देशमुख, आशीष पाटील, निलकंठ ठाकरे, भावसिंग राठोड, अभिषेक चव्हाण, विलास पाटील, अन्वर पटेल, सुनील गावंडे, अर्चित गावंडे, मनोहर पाटील, राम राठोड, लक्ष्मण मानकर, विवेक डुकरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.