मेट्रो -आयआयटी कानपूरसोबत सायबरसुरक्षा सामंजस्य करार

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
नागपूर, 
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नागपूर आणि पुणे येथील ऑपरेशन्ससाठी Metro -IIT Kanpur- Cybersecurity सायबर सुरक्षा बळकटीसाठी आयआयटी कानपूरच्या सी३आयएचयुबी सोबत सामंजस्य करार केला. मेट्रो भवन येथे आयोजित समारंभात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, सी३आयएचयुबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तनिमा हाजरा यांनी केल्या. सी३आयएचयुबी हे आयआयटी कानपूरची उपकंपनी असून मेट्रो संस्थेसह आयआयटी कानपूरचा हा देशातील पहिला सामंजस्य करार आहे. याप्रसंगी महा मेट्रोचे संचालक विनोद कुमार अग्रवाल, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग व ऑपरेशन्स) अनिल कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे तसेच सी३आयएचयुबीचे डॉ. आनंद हांडा, डॉ. रस द्विवेदी आदी उपस्थित होते.
 
nagpur-metro
 
सायबर धोका एक समस्या
या प्रसंगी Metro -IIT Kanpur- Cybersecurity  मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, सायबर प्रणालीला उत्पन्न होणारा धोका एक गंभीर समस्या आहे. महामेट्रो या धोक्यापासून अलिप्त नाही. सायबर हल्ला सारख्या धोक्यापासून मेट्रो वंचित राहू शकत नाही. यापासून बचाव करण्याकरता एक सशक्त प्रणाली असणे आवश्यक असल्याने हा करार करण्यात आला आहे.
जागतिक प्रमाणांशी सुसंगत
Metro -IIT Kanpur- Cybersecurity  सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यासोबतच ऑपरेशन्स कंट्रोल, सिग्नलिंग, टेलिकॉम, सप्लाय, ट्रेन ऑटोमॅटिक फेयर कलेक्शन, बिल्डिंग व टनेल व्यवस्थापन, ट्रेन ऑनबोर्ड सिस्टम्स यांसारख्या महत्त्वाच्या प्रणालींचा समावेश आहे. मेट्रोच्या विविध प्रणालींमध्ये डेटाबेस मॅनेजमेंट, नेटवर्क फायरवॉल्स, एअरगॅप्स आणि स्वतंत्र नेटवर्क यांसारख्या सुरक्षा उपाययोजना आहेत.या नवीन पुढाकारामुळे मेट्रोच्या सायबर सुरक्षेला दर्जाच्या प्रमाणांशी सुसंगत करेल.