वर्धा,
Navratri 2025 : स्थानिक श्री दुर्गामाता हनुमान मंदिर शास्त्री चौक येथे नवरात्री अखंड मनोकामना ज्योती महोत्सवाचे आयोजन नवरात्री निमित्त करण्यात आले आहे.
याप्रसंगी लायन्स लब गांधी सिटीचे संचालक अनिल नरेडी, वर्धा कला महोत्सवचे अध्यक्ष संदीप चिचाटे, खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेश बरे, गोरख पीठाचे प्रमुख व विश्व हिंदू महासंघाचे राष्ट्रीय संयोजक महंत मुकेश नाथ, लायन्स लब गांधी सिटीचे अध्यक्ष आशिष पोहाने, सचिव अतुल रुईकर, मनोज तेलहांडे, स्मिता चिचाटे, अनघा रुईकर, प्रतिभा तेलहांडे, संजिवनी पोहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या पंचवीस वर्षापासून नवरात्रीनिमित्त अखंड महज्योतीचे आयोजन दुर्गामाता मंदिर येथे करण्यात येते. भक्तांची मनोकामना, समाजाचे उत्थान व सकल मानवजातीचे कल्याण व्हावे या उद्देशाने अखंड महाज्योतीचे आयोजन करण्यात येते.