राजीव नगरात नवरात्रोत्सव सोहळा

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Navratri festival 2025 श्री संत गजानन महाराज मंदिर, राजीव नगर, नागपूर येथे नवरात्र उत्सव २०२५ निमित्त सोमवार, २२ सप्टेंबर ते मंगळवार, ३० सप्टेंबर या कालावधीत देवी भागवत कथा या भव्य आणि आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

valas 
 
 
या सोहळ्याचे उद्घाटन पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांच्या हस्ते झाले.प्रवचनकार म्हणून अंजली सुरेश अनासाने (गोविंद नगर), अध्यक्षा – श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान, नागपूर, आपल्या मधुरवाणीतील श्रीमद् देवी भागवत कथा सादर करीत असून भक्तांना आध्यात्मिक आनंद व प्रेरणा देत आहेत. Navratri festival 2025या नवरात्रोत्सवात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संगम अनुभवण्यासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आयोजनात दिलीप हिंगे (आर्किटेक्ट) व प्रमोद गजानन मोडक, सचिव – सेवा समिती, राजीव नगर यांचा सहभाग आहे.
 सौजन्य : रुपल दोडके,संपर्क मित्र
 

शासकीय प्रेस सोसायटीत दुर्गोत्सव सोहळा

आदिशक्ती माँ दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने शासकीय प्रेस कॉलनीतील गणेश-शिव मंदिर परिसरात सलग चौथ्या वर्षी दुर्गोत्सवाचे आयोजन झाले. ढोल-ताशा, रोषणाई व आतषबाजीसोबत देवीचे आगमन करण्यात आले.आरती, गरबा, भजन, होमहवन, सत्यनारायण पूजा, बक्षीस वितरण, महाप्रसाद, दशहरा मिलन व विसर्जन यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.यंदा नव्या कार्यकारिणीने आयोजनाची जबाबदारी स्वीकारली असून परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.

 
prabhu

 सौजन्य : डॉ. प्रभुदास रामटेके, संपर्क मित्र
 
नवरात्रीचे पावन पर्व
नवरात्री च्या पावन पर्वावर विवेक मेंढी यांच्या निवासस्थानी देवी भजन ,जोगवा गोंधळ, महिषासुर मर्दिनी स्तोत्र कार्यक्रम घेण्यात आला जान्हवी भजन मंडळ स्वावलंबी नगर च्या महिला मंडळाने हा कार्यक्रम सादर केला याप्रसंगी संजय उगले, नरेंद्र पहाडे , मीना अमरावतीकर ,स्वाती खानापूरकर, मनिषा देशपांडे ,रेखा जोशी,शुभदा व्याहाडकर,शिल्पा नाईक ,वर्षा पवार मनिषा वसुले प्रज्ञा मुनिश्वर,मीनल बोकारे ,शर्वरी बोकारे,वर्षा कुकडे,मीना तिजारे ज्योती कपाळे ,प्रमिला लिल्होरे,अनिरुद्ध पाठक, रोहीत श्रीवास्तव उपस्थित होते

babu 
 
 
 
सौजन्य:विवेक मेंढी ,संपर्क मित्र
 
आदिशक्तीच्या चरणी नतमस्तक भक्ती
श्री ओमशक्ती सांस्कृतिक मंडळ, प्रभुनगर, न्यू सोमलवाडा येथे यंदा नवरात्री निमित्त स्वानंदी ग्रुप ने भक्तिमय भजन सादर केले.कार्यक्रमात गणेश वंदना, विठूचा गजर, लेझीम, देवीचा गोंधळ, टिपऱ्या व पाऊल भजन यांचा समावेश होता. भक्तांच्या श्रद्धेनं संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हालला.हा दुर्गोत्सव स्त्रीशक्तीच्या अजेयतेचे प्रतीक ठरला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.
 
 
ram
 
सौजन्य : प्रज्ञा जोशी,संपर्क मित्र