पाथरगोटा गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : आ. मसराम

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
आरमोरी,
pathargota village development, तालुक्यातील पाथरगोटा गावाला नुकताच स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला असल्यामुळे त्या गावाला विकासाची गती देण्यासाठी निधी उपलब्धतेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार. तसेच हे गाव पहिलेपासून पेसा क्षेत्रात येत असल्यामुळे सरपंच आरक्षण आदिवासी निघाले. मात्र या ठिकाणी आदिवासींची संख्या नसल्यात जमा असल्याने येथील गावकर्‍यांनी आपल्याकडे आरक्षण बदलण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन आपण राष्ट्रपती, राज्यपाल आणि राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असल्याचे आमदार रामदास मसराम म्हटले.
 

 pathargota village development 
आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे शारदा उत्सव मंडळाच्या वतीने स्वाकृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार मसराम उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सदस्या वृंदाताई गजभिये, दिलीप घोडाम, आनंदराव राऊत, विठ्ठल नखाते, धनपाल मिसार, ढोरे, विठ्ठल नखाते, देवचद दोनाडकर, योगेश ढोरे, जगन कराकर, युवराज बुलै, बाळकृष्ण कराकर, काशीनाथ दोनाडकर, ज्ञानेश्‍वर, अलोने, महेश कुथे, किशोर कराकर यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.