पोलिस म्हणले की भल्या-भल्यांना घाम फुटतो. मात्र, पोलिस विभागात ‘सिंघम’ म्हणून ओळख असलेले Police Inspector Gyanoba Devkate पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी जगत्जननीच्या नवरात्री उत्सवातदरम्यान हरवलेल्या मुलाला आईच्या स्वाधीन करून माय लेकराची भेट घालून दिली. या हृदयस्पर्शी घटनेमुळे उपस्थितांचे डोळे पाणावले होते. गावोगावी फिरून किरकोळ वस्तू विक‘ी करणार्या परिवारातील मुलगा रागावून गेला होता. वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते आपल्या पथकासह गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी रात्री १०.५० वाजता दारव्हा मार्गावर एका सिमेंट मिक्सर एमएच३४ बीझेड९०४६ वर कारवाई करीत होते.
या मिक्सरच्या कॅबिनमध्ये एक अल्पवयीन मुलगा त्यांना दिसून आल्याने त्यांनी त्याची चौकशी केली. त्याने आपले नाव ऋषभ हटकू राजपूत (वय १४, हकीपिकी कॅम्प गोदामनगर तालुका व जिल्हा शिमोगा, कर्नाटक) असे सांगितले. आईवडिलांनी रागावल्यामुळे तो रविवार, १४ सप्टेंबरपासून यवतमाळच्या लोहारा परिसरातून निघून गेला होता. याबाबत अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक‘ार दाखल आहे. मुलाचे आईवडील किरकोळ विक‘ेते असून ते गावोगाव फिरून प्लॅस्टिकचे तोरण, फुलझाडे विकतात. त्यांचा राहण्याचा कायम पत्ता नसतो. ते कुठेही पाल राहतात व उदरनिर्वाह करतात.
मुलगा ज्या ठिकाणाहून निघून गेला त्या लोहारा परिसरातील राहण्याचे ठिकाण बदलून त्याचा परिवार दारव्हा मार्गावर स्थानांतरित झाला होता. तिथे जाऊन चौकशी केली असता हा त्यांचाच मुलगा असल्याचे माहिती मिळाली. या संदर्भात अवधूतवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच मुलाला परिवाराच्या स्वाधीन केले.