सिंगापूर,
Pork at the mosque सिंगापूरमध्ये धार्मिक सौहार्दाला धक्का देणारी घटना घडली आहे. सेरंगून परिसरातील अल-इस्तिकमाह मशिदीतसंशयास्पद पॅकेज आढळले. पहिल्या दृष्टीक्षेपात त्यात डुकराचे मांस असल्याचे दिसले. या घटनेनंतर सिंगापूरचे गृहमंत्री के. शानमुगम यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी या प्रकाराला 'आगीशी खेळण्यासारखे' म्हणत बहुसांस्कृतिक समाजात अशा कृती अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले.

खबरदारी म्हणून मशिदी रिकामी करण्यात आली आणि सिव्हिल डिफेन्स फोर्सने पॅकेज तपासले. त्यात काहीही धोकादायक पदार्थ नसल्याचे आढळले. मात्र या गोंधळात एका महिलेला श्वास घेण्यास त्रास झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले, नंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. Pork at the mosque पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून मशिदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मंत्री शानमुगम म्हणाले, “जर हे खरोखरच डुकराचे मांस असेल तर परिणाम गंभीर असतील. मशिदीसारख्या पवित्र स्थळी असे पॅकेज पाठवणे हे उघड चिथावणीखोर कृत्य आहे.” त्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रार्थनास्थळाला लक्ष्य करणे सिंगापूरमध्ये अस्वीकार्य आहे आणि अशा कृतींसाठी शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाईल.
ही घटना एकटी नाही. गेल्या काही महिन्यांत इतर मशिदींमध्येही अशा पॅकेजेस पाठवण्यात आली आहेत. एप्रिल २०२४ मध्ये एका व्यक्तीला मशिदीच्या प्रवेशद्वारावर डुकराचे मांस ठेवण्यासाठी १२ आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. यापूर्वी सेंट जोसेफ चर्चमध्ये एका धर्मगुरूवर चाकूने हल्ला झाला होता, तसेच २०२० मध्ये दोन मशिदींवर हल्ल्याचे नियोजन करणारा एक १६ वर्षीय मुलगा पकडला गेला होता. ल-इस्तिकमाह मशिदीच्या प्रशासनाने मात्र शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी सकाळी नमाज नेहमीप्रमाणे पार पडली आणि परिसर शांत होता. शानमुगम यांनी जनतेला आश्वासन दिले की सरकार प्रार्थनास्थळांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इतर धर्मगुरूंनीही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून सिंगापूरमध्ये सौहार्द टिकवणे सर्वांची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.