शिधावाटपात अमरावती विभागात झरी तालुका प्रथम क्रमांकावर

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
दुसर्‍या स्थानी अमरावती जिल्ह्यातील धारणी
तिसर्‍या क्रमांकावर यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी

झरीजामनी, 
आदिवासी तालुका म्हणून झरी तालुका प्रसिद्ध आहे. माहे सप्टेंबर २५ मध्ये अमरावती विभागात झरीजामनी तालुका धान्य वाटपामध्ये प्रथम क्रमांकावर आला आहे. तहसीलदार अक्षय रासने वेळोवेळी ration card holders Food distribution  रास्त भाव दुकानदारांना शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळाले पाहिजे यासाठी करीत होते.
 
 
Shidha watap
 
ration card holders Food distribution  धान्यवाटप करताना रास्त भाव दुकानदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. तालुक्यात अंतोदय योजनेचे लाभार्थी संख्या १०००५ असून पीएचएच कार्ड लाभार्थी संख्या ९१४७ असे एकूण १९१५२ लाभार्थी सं‘या असून त्यापैकी १७८७६ धान्य वितरित करण्यात आले. १२७६ शिधापत्रिकाधारक उपलब्ध नसल्यामुळे धान्य वितरित करू शकले नाहीत. झरी तालुक्याचा पॉश वाटप ९३.९४ असल्याने झरी तालुका धान्य वाटपामध्ये प्रथम क्रमांक आला आहे. यासाठी नम्रता पारतकर, अमोल कुमरे, स्वप्नील मुळे यांनी रास्त भाव दुकानदारांना योग्य मार्गदर्शन केले.