अनिल कांबळे
नागपूर,
Shalarth ID scam शालार्थ आयडी घाेटाळ्यातील 30 शिक्षकांच्या चाैकशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. शिक्षक चाैकशीला सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु, ज्या उपसंचालकांवर आराेप आहे, त्यांच्याकडूनच चाैकशी कशी केली जाऊ शकते, असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला आहे.
शिक्षण Shalarth ID scam उपसंचालकांवर पक्षपातीपणाचा आराेप करणाèया याचिकेवर उच्च न्यायालयाने संबंधित चाैकशीला स्थगिती देत शिक्षण उपसंचालकांना उत्तर सादर करण्यास सांगितले हाेते. परंतु, सरकारी वकिलांनी गुरूवारपर्यंत उत्तर काही सादर केले नाही. याचिकेवर न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर आणि न्यायमूर्ती राज वाकाेडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.निखत आरिफ खान आणि इतरांनी ही रिट याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी उपसंचालकांवर पक्षपातीपणाचा आराेप केल्यामुळे हायकाेर्टाने त्यांना याचिकेत उपसंचालकांचे नाव प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्यासाठी याचिका दुरुस्त करण्याची परवानगी दिली. ही दुरुस्ती तातडीने करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले हाेते. न्यायालयाने या प्रकरणी प्रतिवादींना नाेटीस बजावली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. पवन ढेंगे आणि अॅ़ड. एच.एच. चितळे यांनी बाजू मांडली.