१३ ऑक्टोबरपासून
नागपूर,
ST kamagara एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने १३ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
ST kamagara एसटी कामगारांना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ पर्यंतची मूळ वेतनात दिलेल्या वाढीची थकबाकी द्यावी, २०१८ पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, २०१६ ते २०२१ या कालावधीतील वेतनवाढीच्या १ टक्के वाढीव दराची व वरभाडे थकबाकी द्यावी, शासकीय कर्मचार्यांप्रमाणे ५५ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह द्यावा, कर्मचार्याप्रमाणे घरभाडे भत्ता थकबाकीसह द्यावा, कामगारांना १५ हजार रुपये दिवाळी भेट द्यावी, करारानुसार १२ हजार ५०० रुपये फेस्टिव्हल अॅडव्हान्स द्यावा, एसटी महामंडळात नियमित कर्मचार्यांची भरती करावी, निवृत्त कर्मचार्यांना एकरकमी देणी द्यावी, सेवानिवृत्त नऊ महिन्यांऐवजी १ वर्षाचा मोफत पास द्यावा आदी मागण्या धरणे आंदोलनादरम्यान करण्यात येणार आहेत. एसटी महामंडळातील संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समिती तयार केली आहे. १३ ऑक्टोबर २०२५ पासून मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.