जिव्हाळा महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Suyog Nagar Nagpur नवरात्रीच्या पावन पर्वावर श्रीनगर व सुयोग नगर येथील जिव्हाळा जेष्ठ नागरिक महिला मंडळाचा नवीन कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मा. सरस्वती पूजनाने झाली. महिषासुर मर्दिनी स्तोत्र सादर करून नवरात्राचा पावन भाव अनुभवला गेला. फेस्कॉमचे पदाधिकारी जितेंद्र भोयर अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
 
 
jivhala
 
 
नवनिर्वाचित अध्यक्ष माधवी रागिणवार व इतर पदाधिकारी, उपाध्यक्ष कुंजलता पालेवार, सचिव मंजीरी शास्त्री, कोषाध्यक्ष शैलजा बेलोरकर, Suyog Nagar Nagpur सहसचिव स्मिता गव्हाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंचावर सर्व कार्यकारणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
सौजन्य:सुनील गव्हाणे,संपर्क मित्र