पत्रकारितेच्या शतकी प्रवासाचा दस्तऐवज असेल ‘अमृतयोग’

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Amrutyog आगामी फक्त सात वर्षांनी मराठी पत्रकारितेचे द्विशतक पूर्ण होत असताना, पुण्यभूमी, श्री नर्केसरी प्रकाशन संस्थेचा अमृतयोग हा विशेषांक प्रकाशित होत आहे. शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी प्रकाशित होणारा हा विशेषांक भारतातील, विशेषत: विदर्भातील मराठी प्रसारमाध्यमांच्या शतकभराच्या प्रवासाचा दस्तऐवज असेल.
 

Amrutyog 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव व ‘तरुण भारत’चे शताब्दी आणि दैनंदिन संचालन करणाऱ्या श्री नर्केसरी प्रकाशन संस्थेचा अमृत महोत्सव अशा त्रिगुण योगात ‘अमृतयोग’ प्रकाशित होत आहे.त्यामध्ये तरुण भारत व श्री नर्केसरी प्रकाशन या संस्थांचा महत्त्वपूर्ण प्रवास, त्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान, १९१६ साली साताड्याहून सुरू झालेल्या ‘तरुण भारत’ची भूमिका, तेव्हापासूनचे संपादक, मंडळांची कामगिरी, तसेच व्यवस्थापन नर्केसरी स्मारक मंडळाकडे गेल्यानंतरचा प्रवास, यांचा आढावा घेण्यात आला आहे.याशिवाय या विशेषांकाच्या माध्यमातून तरुण भारतची निवडक जुनी व दुर्मिळ मुखपृष्ठे, त्या संस्थेशी संबंधित महत्त्वाच्या संपादकीय, अनुभव, काही लेखक-वाचकांचे मनोगत, तरुण भारतावर विश्वास व प्रेम असलेल्यांनी शाब्दिक उपक्रम इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.हा विशेषांक वाचकांसाठी सेवेते सादर केला जाणार असून, अमृतयोग सर्वांसाठी उपयुक्त दस्तऐवज ठरेल.