यात्राजत्रेतील विदर्भ

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
कोणे एके काळी
स्वाती काळे (कोलारकर)
Vidarbha Tirth Yatra नवरात्रीदरम्यान विदर्भातील गूढमग्न मंदिरे समाधिस्त अवस्थेतून बाहेर येऊ लागतात. दशदिशांवर एक दैवी चैतन्यप्रभा पसरते. मंदिराचा परिसर यात्राजत्रांनी बहरतो. फुलापानांवरून टपटप गळणार्‍या पावसाच्या थेंबांनी काळी मऊशार माती अंकुरत जाते. विदर्भातील देवदेवतांचे घरच्या कोनाड्यात अधिष्ठान आहेच; पण त्यांच्या श्रीक्षेत्रीच्या दैवी अस्तित्वखुणांमुळे सबंध वर्‍हाडी भावविश्व संपन्न झाले आहे. विदर्भनगरीत देवता एकाच परिघात गुण्यागोविंदाने नांदतात. यात्राजत्रांमध्ये भक्तांना तोंड भरून आशीर्वाद देतात.
 
 
ramtek
 
 श्रीक्षेत्र रामटेक येथे दरवर्षी चैत्र व कार्तिकी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमेस भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून त्याची तीनही पुरे जाळली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी पौर्णिमेस देवळाच्या शिखरावर पीतांबर जाळण्यात येते. ते दृश्य बघण्यासाठी तोबा गर्दी रामटेक क्षेत्री जावे तर श्रीरामाच्या अनेक गोड गोष्टी ऐकायला मिळतात. भाविकाच्या दरवाजावर जावे, चहापाणी घ्यावे आणि त्याच्या तोंडून प्रभू श्रीरामचंद्राच्या रसाळ गोष्टी ऐकाव्यात. एकदा शंबुक नावाचे शूद्र मुनी तपश्चर्या करीत होते. तेव्हाच्या काळात त्यांना तपश्चर्या करण्याचा अधिकार नव्हता. याच काळात अयोध्येस एकाचा अकाली मृत्यू पावला. श्रीरामचंद्रांना वाटले कुठेतरी अधर्म आहे. त्यामुळे ते गडापर्यंत आले. तेव्हा या गडावर शंबुक तपश्चर्या करीत बसलेला त्यांना दिसला. चंद्रहास खड्गाने श्रीरामाने शंबुकाचा वध केला आणि त्याला दिव्यत्व प्राप्त झाले.
 
 
रामटेकच्या यात्रेला नागपूरचे सर्व भोसले राजे आवर्जून जात असत. Vidarbha Tirth Yatra तीर्थ अंबाळा तळ्याच्या काठी तर मुधोजी भोसले यांनी वाडा बांधला होता. इ. स. १७८३ पासूनचे अनेक उल्लेख सापडतात. ‘१७८८ च्या यात्रेत मुधोजी भोसलेंची प्रकृती चांगली नसल्यामुळे श्रीक्षेत्र रामटेकला गेले नव्हते. पौर्णिमेला रात्री देवळात त्रिपुर जळतो,’ असे दाखले इतिहासात आहेत. नागपूरपासून १० किलोमीटर अंतरावर सावनेर मार्गावर कोराडीच्या देवीचे देऊळ आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला कोराडी येथे देवीची यात्रा भरते. याही यात्रेला भोसले परिवार दरवर्षी सहभागी होत. एप्रिल १७८८ रोजी दोन प्रहरा तीन कोस मौजे कोराडी येथे स्वारी (मुधोजी) गेली. तेथे देवीजवळ पौर्णिमेची यात्रा भरत असती व पुत्र राजश्री खंडोजी भोसले यांचा काही नवस होता. तेथे गोंधळ घातला.’ जानेवारी १७८८ मध्ये सेना धुरंदर मुधोजी भोसले आणि रघोजी कोराडी देवीच्या दर्शनास गेले होते.’
 
 
‘२१ एप्रिल १७८८ मध्ये चांगली नसल्यामुळे सेना धुरंदर मुधोजी सायंकाळी कोराडी येथे गेले. देवदर्शन जाहले. याच ठिकाणी मुधोजी भोसले यांच्या अंगात ताप भरला. त्यामुळे सायंकाळी नागपुरात परतले.’ इतिहासात पानोपानी देवीचे दाखले दिले आहेत. Vidarbha Tirth Yatra विदर्भाच्या इतिहासात कोराडी देवीयात्रेचे महत्त्व निर्विवाद आहे. धापेवाडा म्हणजे वर्‍हाडचे पंढरपूर आहे. धापेवाड्याचा विठोबा कळमेश्वरपासून उत्तरेला नऊ किलोमीटरवर भक्तांना दिलासा उभा आहे. तो ४०० वर्षे जुना असण्याचे संदर्भ इतिहासात येतात; पण त्याहीपेक्षा तो प्राचीन असू शकतो. कोलबा महाराज या भागातले संतपुरुष होते. कोलबास्वामी दरवर्षी पायी धापेवाड्याहून आषाढी एकादशीला पंढरपुरी जायचे. एकदा त्यांच्या स्वप्नात पंढरपूरचे विठोबा आले आणि त्यांनी कोलबा स्वामीला सांगितलं, ‘आता तुला पंढरपुरी येण्याची गरज नाही. धापेवाड्याच्या चंद्रभागा आम्ही तुला भेटू.’ कोलबा स्वामींनी मूर्तींचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य. त्यांना त्या मूर्ती नदीत सापडल्या. आज या मूर्ती धापेवाड्याच्या मंदिरात सर्वजण पुजतात. आषाढी एकादशीला येथे खूप मोठी यात्रा भरते. काही वेळेस पंढरपूरला त्यादिवशी विठोबाचे दर्शन होत नाही. कारण ते सावळे परब्रह्म धापेवाड्याला अवतरले असते.
 
 
इ. स. ते १८१६ या दरम्यान दुसरे रघुजी महाराज विठोबाच्या दर्शनाकरिता धापेवाड्यास अनेकदा यायचे. धापेवाड्याच्या अवतीभवती तेव्हा दाट जंगल होते.अनेक हिंस्र श्वापदे तेथे फिरत असत. महाराज शिकारीसाठी यायचे, पण विठोबाच्या पाया पडूनच त्यांचा मुक्काम हलायचा. विदर्भातील अष्टविनायक हे वर्‍हाडी संस्कृतीला पडलेले अलौकिक स्वप्न आहे. विदर्भात प्राचीन काळापासून बुद्धीच्या देवतेला विशेष स्थान अष्टविनायकाच्या यात्रेचे वैदर्भीयांच्या मनात स्वतंत्र स्थान आहे. आदासाचा शमी विघ्नेश विदर्भातील अष्टविनायकांपैकी सर्वात प्राचीन वाकाटककालीन जागृत गणेश क्षेत्र आहे. नागपूरहून वायव्य दिशेस काटोल रोडने निघालो की, साधारण एक-दीड तासात आपण आदासाच्या गणपतीचे दर्शन घेऊ शकतो. आदासाच्या गणपतीची मनोभावे उपासना केली तर लग्न लवकर जमतं म्हणतात.
 
 
Vidarbha Tirth Yatra आदासा गणेशाची स्थापना विष्णूच्या अवताराने केली. बळीराजाच्या पराभवासाठी विष्णूने बटू वामनाचा अवतार घेतला. गणेश पुराणाच्या क्रीडा खंडात एक छान आख्यायिका सांगितली आहे. आदासा क्षेत्री भीम नावाचा व्याध राहत होता. येणार्‍या-जाणार्‍या वाटसरूंवर तो दरोडे टाकून आपला संसार चालवायचा. एकदा हरणाची शिकार करून तो घरी परत येत होता. तेव्हा पिंगाक्ष नावाचा अतिमानव त्याच्या मागे लागला. घाबरला आणि जवळच्या शमी वृक्षावर लपला. त्याचा पाठलाग करीत पिंगाक्षही शमी वृक्षावर चढला. दोघांमध्ये झाडावरच झटापट झाली. बटू वामनाने स्थापन केलेली गणेश मूर्ती शमी वृक्षाखालीच होती. त्यांच्यात झालेल्या झटापटीमुळे वृक्षाच्या बुंध्याजवळ असणार्‍या गणेश मूर्तीच्या मस्तकावर शमीच्या पानांचा आपोआप अभिषेक झाला आणि श्रीगणेशाने प्रसन्न होऊन दोघांनाही वर दिला.
 
 
प्राचीन काळी येथे शमी वृक्षांचा प्रचंड गोतावळा होता. त्यामुळे या देवस्थानाला ‘शमीमूलपूर’ असेही म्हणत. Vidarbha Tirth Yatra विदर्भातील इतिहासकार श्री. के. चितळे यांच्या मते वाकाटकानंतर इ. स. सहाव्या शतकानंतर देवालय घनघोर अरण्यात अदृश्य झाले. पण अरण्यात मूर्तीचा सांभाळ मात्र आपोआप झाला. नवेगावबांध या सरोवराची निर्मिती गोंड राज्यात १८ व्या शतकाच्या सुरुवातीला कोलू पटेल या केली. त्यावेळी नवेगाव तलाव बांधण्यास ६४ हजार रुपये खर्च आला होता. शेतीला पाणी पुरवण्यासाठी मातीचा बांध तयार करण्यात आला होता. कालांतराने कोलू पटेल या बांधाचा निर्माता कोलसुर देव झाला. तलावाच्या भोवतीचे डोंगर आहेत. त्यातील एका डोंगरावर या कोलसुर देवाची समाधी आहे. इतर सात शिखरांवर कोलसुर देवाच्या सात बहिणी राहत दिवसभर मजूर काम करायचे. रात्री ते थकून झोपायचे. त्यानंतर कोलसुर देवाच्या मदतीला त्याच्या बहिणी धावून यायच्या. टेकडीवर अजूनही काही पिवळे-पांढरे दगड दिसतात. ते दगड म्हणजे बहिणींच्या मातीच्या टोपल्या आहेत. कोणाचे आक्रमण झाले तर तलावाच्या मध्यभागी असलेल्या मालडोंगरी बेटावर लोक आश्रयाला यायचे.
 
 
Vidarbha Tirth Yatra विदर्भात फक्त देवदेवतांना पूजत नाहीत तर आक्रमणापासून रक्षण तोफेलासुद्धा वैदर्भीय लोकांनी देवत्व बहाल केले आहे. भंडार्‍यापासून आग्नेय दिशेला एक सानगडी नावाचे चिमुकले खेडे आहे. तेथे दिवाण घराण्याने एक किल्ला बांधला होता. मध्य प्रदेशातील शिवणीकडचे हे दिवाण घराणे. हा किल्ला ‘सहान’ किल्ला म्हणून प्रसिद्ध होता. किल्ल्याजवळ एक जुनी तोफ पडली होती. ती तोफ कुठून आली, कशी आली कोणालाच नाही. पण स्थानिक लोकांसाठी ती ‘तोफदेवता’ आहे. असं म्हणतात की, तिच्या आवाजामुळे पेंढारी पळून गेले होते आणि गाव वाचला होता. या तोफेजवळ एक लहान तलाव होता. तोफेला बत्ती दिल्यावर तिचा प्रचंड आवाज व्हायचा आणि त्या आवाजामुळे कानाचे पडदे फाटू नये म्हणून बत्ती देणारा माणूस ताबडतोब तलावात उडी मारायचा. ही त्या ठिकाणावरून ज्यावेळी हलविण्याचा प्रयत्न व्हायचा त्यावेळी ते सरकार बदलल्या जायचे. एकदा एका राज्यकर्त्याने १६ बैलगाड्या आणून तोफ खेचण्याचा प्रयत्न केला. पण तिला ओढून नेता आले नाही. सानगडीला विठोबा, महादेव, लक्ष्मीनारायण आणि हनुमान सर्व देवता एकत्र नांदतात.
 
 
१५ व्या शतकात खांडक्या बल्लाळ राजा बल्लारपूर येथे राज्य करायचा. आपली सुंदर नगरी त्यानेच वसविली. त्याच्या सर्वांगावर असणारे खांडगे झरपट नदीच्या काठावरील एका खळग्यातील पाण्याने नष्ट झाले. एकदा तो नदीवरून स्नान करून येत होता. काही पावलं चालल्यावर त्याला खडकात कोरलेली महाकाली देवीची अद्भुत मूर्ती दिसली. त्याने तिथे मंदिर बांधले. त्यानंतरचा गोंड राजा बिरशहा याला एका युद्धात मोठा विजय मिळाला. त्याची राणी हिने जुने मंदिर पाडून नवीन मंदिर बांधले. सध्याचे महाकालीचे मंदिर राणी हिराईचे आहे. देवीसमोर चैत्र पौर्णिमेला मोठी जत्रा भरते. पोतराजाच्या डफर्‍यांतून होणारा ‘डांग डांग डांग धबाड’ आवाज वातावरण धुंद करतो. भक्ताची हाक आईपर्यंत पोहोचते.
 
 
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमारेषेलगत एक अद्भुत मंदिर आहे. त्याचे नाव आहे महाकालेश्वर. एकदा यमाच्या मनात आले त्याची पूजा का होत नाही? त्याने शंकराकडे तक्रार केली. भोळ्या शंकराने तुझेही मंदिर पृथ्वीवर राहील असा वर दिला. तेव्हा यम म्हणाला, ‘हे भगवान, मंदिर राहिले तरी भीतीने कोणीही माझ्या मंदिरात येणार नाही. त्यामुळे तुमच्या मंदिरात तुमच्या पिंडीजवळ मला स्थान द्या.’ शंकराने ‘तथास्तु’ म्हटले. त्यामुळे Vidarbha Tirth Yatra महाकालेश्वर मंदिरात एकाच ठिकाणी आजूबाजूला पिंडी आहेत. शंकराच्या पिंडीबरोबर यमाची पिंडही पुजली जाते. हे मंदिर पूर्णपणे दक्षिणात्य धाटणीचे आहे. आवारात गणपती, सरस्वती, बालाजी, मारुती सर्व देवता सुखाने नांदत आहेत. असेच एक मंदिर अमरावतीत परतवाड्याजवळ बहिरमबाबाचे आहे. तो शंकराचा भैरव होता. बहिरमबाबाची यात्रा विदर्भातील सर्वात मोठी यात्रा आहे. विदर्भभूमी लावण्यवती आहे, यशोमतीही आहेच. पण आदिम ती अद्भुताची भूमी आहे. पेरलेल्या असंख्य दैवी संकेतांची बीजे यात्राजत्रेच्या काळात तरारून वर येतात आणि दिव्य आशीर्वचनांनी लगडलेली चैतन्याची झाडे वर्‍हाडभूमीत नाचू गाऊ लागतात.