वर्धा,
wardha-garba-dandiya-rain : वर्धा शहरात गेल्या दोन दिवसांपासुन ढगाळी वातावरण होते. आज दुपारी काही भागात पाऊस येऊन निघून जात होता. परंतु, कालपासुन पावसाने सायंकाळची वेळ निवडल्याने नवरात्रीतील गरबा, दांडियाचे पाणी पाणी झाले. आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजतापासुन ढगांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे लंगरच्या स्वयंपाकात पाणी जमा झाले. पावसाचे सावट आहे. वर्धेत गुरुवारपासूनच येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात सहसा महालक्ष्मी सणानंतर पावसाची तीव्रता कमी होते. यंदा मात्र पितृपक्षातही चांगला पाऊस झाला. आता नवरात्रीतही दमदार पावसाची शयता वर्तविण्यात आली आहे. वर्धेत आज दुपारी १२ वाजतापासुन पावसाने हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून उन्ह आणि पावसाचा खेळ सुरू होता. सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस झाल्याने गरबा व दांडियाला फटका बसला. तसेच बाहेर गावातून दुर्गादेवी पाहण्यासाठी आलेल्या भतांचीही गैरसोय झाली.
शहरात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. या उत्सवाला पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने काल गुरुवार २५ रोजी गरबा आणि ठिकठिकाणी लंगरच्या आयोजनाची तयारी केली होती. पण ऐन सायंकाळच्या सुमारास परतीच्या पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील नवरात्रोत्सव विदर्भात प्रसिद्ध असून पाच दिवस राहिल्याने ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातील नागरिकसुद्धा दर्शनाकरिता येतात. अनेक ठिकाणी गरबा, दांडियासह मोठ्या प्रमाणात लंगरच्या आयोजनाची तयारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच सुरू केली होती. अनेक ठिकाणी मोठ-मोठे पेंडॉलसुद्धा टाकले होते. विविध प्रकारचे पवानसुद्धा तयार झाले होते. थोड्याच वेळात मातेची आरती करून प्रसाद वितरणाला प्रारंभ होणार होता. परंतु, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. पाऊस आल्याने बाहेर गावातील भाविकांची पावले सुद्धा थांबली.