गोपाल चिकाटे
तळेगाव (श्या.पंत),
Telai Mata : आष्टी तालुक्यातील आष्टी -साहूर राष्ट्रीय महामार्गावर असणारी स्वयंभू श्री अंबा तेलाई मातेचे जागृत देवस्थान आहे. जवळ आदिवासी समाजाचे पांढुर्णा गाव आहे. स्वयंभू तेलाई माता बोराच्या झाडाखाली प्रगट झाली असे जाणकार सांगतात. दोनशे वर्षाच्या वर काळ झाला असून सभोवताल घनदाट जंगल परिसर असून तेलाई माता ही पूर्वीपासून जमिनीवर असून पूर्वाभिमुख आहे.

जंगलातून गावकरी बैलगाडीने दगड धोंड्यातून प्रवास करायची. येथून साहूर, माणिकवाडा, तारा सावंगा, गावातील नागरिक आठवडी बाजाराकरिता व व्यवसाय करण्याकरिता आष्टीला जात असत. कुणी पायदळ तर कुणी डोयावर ओझे घेऊन तर कुणी घोडा, गाढवावर साहित्य घेऊन जायचे. आष्टी येथील वृद्ध महिला येथे येऊन मातेच्या अंगावर तेल वाहत असे तेव्हापासून मातेचे नाव तेलाई माता म्हणून नाव रूपास आले. याच परिसरात एक कुंड व हरीनी लोट आहे. हरणी लोट उंचावर असून उन्हाळ्यातही झुळझुळ पाणी वाहते. एकदा येथून बैलबंडीने लग्नाची वरात मातेच्या परिसरातून जात असता बैलबंडीचे बैल अचानक खाली बसले. प्रयत्न करूनही ते उठे ना! त्यांनी सभोवताल इकडे तिकडे शोध घेतला असता त्यांना बोराच्या झाडाखाली देवी आढळली. त्यांनी मातेला वंदन करून आमचे सर्व कार्य सुरळीत पार पडू दे तुझ्या डोयावर सावली करू असा नवस केला. आश्चयर्र् बैल उठले त्यांचा पुढील प्रवास सुरू झाल्याचे गावातील वृद्ध सांगतात. मातेच्या दर्शनाला नवरात्र चैत्रामध्ये अफाट गर्दी असते.
परिसरातील भत पायदळ, वाहनाने सकाळ-संध्याकाळच्या आरतीला उपस्थित असतात. येथे मातीच्या दर्शनाला रात्री अकरा ते एकच्या दरम्यान पट्टेदार वाघ दर्शनाला येतो असे काही जाणकार सांगतात. मंदिराच्या गेट जवळ बसून मोठ मोठ्याने डरकाळ्या फोडून काही वेळाने निघून जातो अनेक भक्तांनी अनुभव घेतल्याचे काही जाणकार सांगतात. आष्टीपासून मातेच्या मंदिराकडे जाण्याकरिता चार ते पाच किलोमीटरचे अंतर असून नऊ वळणाचा चक्रीघाट आहे. मातेचे स्थान डोंगर माथ्यावर आहे. स्वयंभू तेलाई माता मंदिर तीस वषार्र्ंपूर्वी भताच्या स्वप्नात आली. तेलाई मातेचे चमत्कार दर्शन घडल्याने सर्वत्र परिसरात प्रसार होत आहे. या ठिकाणी अनेकांना दर्शन घडल्याने हळूहळू उघड्यावर असलेली माता आता गावकर्यांच्या व भक्ताच्या सहकार्याने घुंगट निर्माण झाले असून सदर मंदिर हे निसर्गरम्य स्थळी आहे त्या ठिकाणी चारही बाजूने जंगल परिसर असल्याने येणारे जाणारे प्रवाशी विश्रांती घेतात. तेलाई माता पाच गावाच्या शिवेवर प्रगट झालेली आहे. मंदिरातील मुर्त्या स्वयंभू असल्याचे दत्तू परतेती यांनी सांगितले. पूर्वी तीन मुखटे प्रगट झाल्या होत्या. पण आता त्या सात बहिणी आहेत. पुढे नऊ बहिणी प्रगट होईल असा विश्वास त्यांनी व्यत केला.