वर्धा,
Wardha Weather : मुसळधार पावसात वीज पडून दोन ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना सोनेगाव -धोत्रा मार्गावर शुक्रवार २६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. अनिल ठाकरे, सौरभ ठाकरे दोन्ही रा. भिवापूर, अशी मृतांची नावे आहेत. तर वेदांत ठाकरे रा. भिवापूर, असे जखमीचे नाव आहे.
अनिल ठाकरे, सौरभ ठाकरे, वेदांत ठाकरे हे तिघेही दुचाकीने सोनेगाव येथून धोत्राकडे दुचाकीने येत होते. दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने ते मध्येच थांबले. यातच वीज पडल्याने अनिल ठाकरे आणि सौरभ ठाकरे जागीच ठार झाले. तर वेदांत हा जखमी झाला.