कथा स्त्री संघर्षाची

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
वंदना बोकील
woman's struggle नऊ दिवस आणि नऊ रात्रीचे युद्ध आणि त्यानंतर असुरी शक्तींवर देवीने मिळविलेल्या विजयाचा उत्सव आजही आपण नवरात्रीच्या रूपाने साजरा करतो. या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते. तिचे स्मरण करत, नतमस्तक होत आराधना, उपवास, व्रतवैकल्य करण्याची प्रथा आजही भक्तिभावाने जाते. मात्र, दुसरीकडे महिलांवरील अत्याचार, हिंसाचार, अन्यायाच्या कथा सतत कानावर येतच असतात. क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या काही घटनांमुळे तर संपूर्ण समाजमन ढवळून निघताना दिसते. अशा घटना स्त्रीचा संघर्ष नवा नसल्याचे सत्य पुन्हा एकदा समोर मांडतात आणि या उत्सवातून आपण नेमके काय मिळवायला हवे हे दाखवून देतात.
 
 
women1
 
अनादिकाळापासून woman's struggle  बाईला संघर्ष चुकलेला यात मला प्रथम जनाबाई दिसते. त्या काळी स्त्रीला आध्यात्मिक मार्गावरदेखील सहजतेने, उजळ मात्त्टयाने वावरणे शक्य नव्हते. जनाबाईचे दु:ख तर दुहेरी-तिहेरी आहे. एक तर तिचा ‘स्त्री’जन्म आहे, दुसरे म्हणजे ती दासी आहे. ती स्वत:विषयी ‘नामयाची दासी’ असे म्हणते. त्यामुळे दासीपण हे तिचे आणखी एक दु:ख वा शोषणाच्या अंगाने विचार करता येणारी बाब आहे आणि तिसरे म्हणजे ती निम्न जातीतील आहे. अशा तिन्ही प्रकारच्या दु:खाबरोबरच दारिद्र्यही आहे. ती अनाथ आहे. आईवडिलांनी अगदी लहान असताना तिला नामदेवांच्या घरी सोडून दिले आहे. म्हणजेच तिचे जगणे आश्रिताचे आहे. असे सगळे असताना कधी तरी विठुनामाची गोडी लागली आणि ती भक्तीमध्ये रममाण झाली. पण त्या लोकांना हेदेखील पटले नाही. म्हणूनच समाजाने तिला सुळावर चढवण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलाचा धावा केल्यानंतर त्या सुळाचे पाणी झाले. या आणि अशा आख्यायिकांमधील अद्भुत भाग बाजूला ठेवला तरी मूळ मुद्दा हाच दिसतो की, जनाबाईने विठ्ठलाची भक्ती करणेही समाजाला मान्य नव्हते. स्त्रीने आखून दिलेल्या मार्गावरून खाली मान घालून चालणे, हेच अपेक्षित हा मार्गही पुरुषप्रधान व्यवस्थेनेच आखून दिला आहे. तेव्हा त्याला विरोध करताना जनाबाई म्हणते,
 
‘डोईचा पदर आला खांद्यावरी
भरल्या बाजारी जाईन मी...’
जनाबाईचा हा उद्गार मला अगदी पहिला स्त्रीवादी उद्गार वाटतो. कारण त्या काळात ‘डोईचा पदर खांद्यावर येणे’ म्हणजे एक प्रकारे नि:संग झाल्यासारखे होते. पुढे ती,
‘जनी म्हणे देवा | झाले वेसवा
रिघालें केशवा | घर तुझे’
असेही म्हणते. तुझ्या घरी येण्यासाठी मी वेश्या होण्यासही तयार असल्याचे म्हणते तेव्हा ती स्त्री म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची कोणती किंमत मोजायला सिद्ध झाली आहे, हेही दिसते. एवढा नि:संगपणा दाखवणे हा मला लखलखीत स्त्रीवादाचा उद्गार वाटतो. स्त्रीवादाची रीतसर मांडणी वगैरे नंतर झाली, तो विचारव्यूह आला. विशेषत: आपण तो पाश्चात्त्यांकडून घेतला. पण आपल्याकडे बाईला तो जाणवत नव्हता असे नाही तर ठायी ठायी जाणवत होता. म्हणूनच लोकसाहित्यामध्येही-
‘राम म्हणू नाही राम,
नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई
राम हलक्या दिलाचा’
 
असे जात्यावर दळणार्‍या woman's struggle  बाईनेच म्हणून ठेवले आहे. तिने थेट रामाला हलक्या ‘दिला’चा म्हणण्याइतके धारिष्ट्य दाखवले आहे. अर्थ ती विचार करत होती आणि साहित्यातून शक्य होईल तसे मांडतही होती.
बहिणाबाईंनीदेखील वेगवेगळ्या पद्धतीने आत्मबलाची प्रचीती दिली आहे. आत्मबल प्रत्येक बाईकडे असते, पण तिला त्याची ओळख नसते. ती नसण्यामागे अर्थातच सामाजिक वास्तवाचा भाग येतो. कारण पुरुषप्रधान व्यवस्था तुम्ही स्वतंत्रपणे विचार करूच नये, म्हणून शक्य ते सगळे उपाय योजते. बाईला वंचित ठेवण्याचेही हेच कारण होते. कारण एकदा का शिक्षण मिळाले की, ती स्वतंत्र विचार करू लागेल, तिला स्वत:च्या शोषणाची जाणीव होईल आणि ते आम्हाला नको आहे, असे व्यवस्थेचे म्हणणे होते. कारण असे होणे त्यांच्यासाठी गैरसोयीचे होते. शोषणाविरुद्ध आवाज उठवला तर त्यांचा एकाधिकार, सत्ता धोक्यात येणार होती. म्हणूनच पूर्वीच्या स्त्रीकडून करवून घेतलेली सेवादेखील नीतीच्या, धर्माच्या, पतिनिष्ठेच्या नावाखालीच होती आणि तिच्याकडून निरंतर सेवा मिळत राहावी, अशी रचनाही या पुरुषप्रधान व्यवस्थेनेच केली होती. मग यासाठी बर्‍याच कल्पना, गोष्टी रचल्या गेल्या. तुम्हाला स्त्री, शूद्राचा जन्म का मिळतो हे सांगणारा कर्मविपाक सिद्धांतच आपल्याकडे आहे. तो म्हणतो की, तुमच्या कर्मावर पुढचा जन्म अवलंबून म्हणजेच हा जन्म स्त्री वा शूद्राचा मिळणे याचा अर्थ तुम्ही गेल्या जन्मात भयंकर पाप केले असा होतो. तेव्हा किमान या जन्मात तरी स्त्री वा शूद्र म्हणून आम्ही तुम्हाला आखून दिलेले विहित कर्तव्य बिनबोभाट, खाली मान घालून, विनातक्रार आणि निष्ठेने पार पाडा म्हणजे पुढचा जन्म चांगला मिळेल... असे सांगणारी ती होती. मात्र असे असताना आत्ताच्या जन्माबद्दल कोणी बोलतच नव्हते. अशा स्थितीमध्येही स्व-बळ ओळखण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रत्येक स्त्रीने अन्यायाला वाचा फोडलेली दिसते. सावित्रीबाई तर आहेतच. नंतर १८८२ मध्ये ‘स्त्री-पुरुष तुलना’ लिहिणार्‍या ताराबाई शिंदे दिसतात. ताराबाईंचा हा निबंध लखलखीत वक्तृत्वाचा आणि धगधगीत विचारांचा उद्गार म्हणून समोर येतो. म्हणजेच मिळेल तिथे बाईने होण्याची संधी घेतल्याचे दिसून येते.
 
 
इथे मला प्रिया तेंडुलकरची ‘लग्न संपल्यावर’ नावाची एक सुंदर कथा स्मरते. कथेतील मुलगी लग्नानंतर सासरी जाते, पण आपल्याला हवे तसे शय्यासुख ती देऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नवरा एक-दोन वर्षांमध्येच माहेरी जायला सांगतो. मुंबईमध्ये माहेरी आल्यानंतर त्या दोन खोल्यांच्या घरातली आपली जागा गेली असल्याचे लक्षात येते. आता ती जागा भावाच्या woman's struggle बायकोने घेतलेली असते. लहानपणापासून तिला सासरी कसे वागायचे हे शिकवले गेलेले असते. पण ‘लग्न संपल्यानंतर’ काय करायचे हे मात्र कोणीच शिकवलेले नसते... अशा विचारानिशी पुढे जाणारी ही कथा आपले डोळे उघडते. भावबंबाळ वगैरे न करता ती आपल्याला अंतर्मुख आणि अस्वस्थ करून जाते. सर्वसाधारण आजही मुलींना आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श आई होण्यासाठी घडवले जाते. पण हे सगळे साध्य करूनही कोणी तुम्हाला मान देत नसेल तर काय करायचे, हे कोणीच कधी शिकवत नाही. ते शिकवण्याची वेळ आता आली आहे.
 
 
woman's struggle  आज समाजात दोन प्रकारचे चित्र दिसते. एक म्हणजे काही मुली आपल्या हक्क, अधिकारांबद्दल अत्यंत दिसतात. लोकशाही तत्त्वे, व्यक्तिस्वातंत्र्य मान्य असणार्‍या सुसंस्कृत घरांमधील काही जणी अतिशय विचित्र गोष्टींचा आग्रह धरून लग्न मोडताना दिसतात तर दुसरीकडे सगळे सोसून राहणार्‍यांकडे समाज दुर्लक्ष करताना दिसतो. त्यांना हवा तसा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळेच आता वैचारिक जडणघडण करण्यात आणि विवेकनिष्ठ जगण्याचा विचार देण्यात कुटुंब संस्था म्हणून आपण कमी पडतो का, याचा विचारही व्हायला हवा. आपण भारतीय कुटुंब पद्धतीचा उदो उदो करतो. जगात आपली कुटुंब पद्धत श्रेष्ठ असल्याचे गोडवे गातो. पण आपली हीच व्यवस्था स्त्रीचे किती शोषण करते, हे डोळे उघडून कधी बघणार? आजही आईचे घरात होणारे शोषण बघून मुलगी आपले पुढे असे व्हायला नको, असा विचार करते. अगदी विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये देखील दिवसभर नोकरी करून आल्यानंतर नवरा पाय पसरून टीव्ही बघत बसतो तर बायको कपडे बदलून तडक रात्रीच्या स्वयंपाकात जुंपलेली दिसते. हे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये बहुतांशी दिसणारे चित्र आहे. पुरुषांनी बायकोला थोडी फार मदत केली तर लगेचच आपले कौतुक करावी, अशी त्यांची अपेक्षा असते. कुटुंबाने तसेच समाजाने आपल्या ओवाळाव्यात ही भावना असतेच. पण बायकोचे कौतुक कोण करणार? दिवसभर काम करणार्‍या, करीअर करणार्‍या बायकांना तुम्हाला घरचा पाठिंबा आहे म्हणजे काय, असा प्रश्न खाजगीत विचारला तर ‘विरोध नाही...’ असेच उत्तर मिळते. आज नवरे बायकांना हवे ते करू देतात, पण ‘आमचे सगळे करून...’ असा त्यातील छुपा अर्थ असतो. त्यात काही झालेली आजही मान्य नसते. दोन दिवस थोडी गैरसोय सहन करायची तयारी नसते. अशा परिस्थितीला तोंड देण्यातच बायकांची बरीच शक्ती खर्ची पडते. आजही अनेक ठिकाणी हेच चित्र आहे. तेव्हा नवरात्रीच्या निमित्ताने, आदिमाया शक्तीची पूजा बांधताना या आणि अशा अनेक प्रश्नांवर समाजाने विचार करायला हवा आणि त्यांची व्यथा समजून कष्ट दूर प्रयत्न करायला हवा. हेच सध्याच्या काळाला साजेसे साजरीकरण ठरेल.
 
ज्येष्ठ संपादक, लेखिका