नागपूर,
ZP Primary School Khursapar जि.प. प्राथमिक शाळा खुर्सापार (पं.स. सावनेर) चे मुख्याध्यापक प्रदीप पडवाल यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कर्तव्यनिष्ठ, नवोपक्रमशील व विद्यार्थीप्रिय अशा पडवाल सरांनी शाळेचा कायापालट घडवून आणत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक दर्जा उंचावला.ZP Primary School Khursapar त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेला माझी सुंदर शाळा, ISO मानांकन व जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची सुंदर परसबाग ही विशेष कामगिरी साध्य झाली.त्यांच्या या यशाबद्दल गावकरी, शिक्षकवर्ग तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौजन्य :प्रदीप फाळके ,संपर्क मित्र