गडचिरोलीत जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

(डॉ. अशोक नेते यांनी दाखविली हिरवी झेंडी)

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
गडचिरोली, 
Ashok Nete : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने ‘ग्रँड लंच ऑफ नमो युवा रन-2025’ या उपक्रमांतर्गत आज येथील इंदिरा गांधी चौकातून जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री माजी खासदार अशोक नेते यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
 
jlk 
 
 
या स्पर्धेत खुला गट मुलींमधून रुचिका सुतीन नागरकर, लावण्या सुभाष नागरकर, मंदा तुकलवार तर खुला गट मुलांमधून रोषण बोदलकर, सौरभ कन्नाके, निखिल टेंभुर्णे यांनी विजय मिळविला. तसेच वयोगट 14 ते 18 वर्ष मुलीमध्ये वृंदा भुरसे, संध्या नरोटे, अश्‍विनी खेडेकर, गिताजंली चौधरी, वयोगट 14 ते 28 मुलांमध्ये विवेक भगत, विवेक भोयर, हर्षल सुरकर तर जेष्ठ नागरिक या गटातून ज्ञानेश्‍वर दुर्गे, शामराव सुरजागडे आदींनी बाजी मारली.
 
 
या स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘नशामुक्त भारत’ या घोषवाक्याला प्रत्यक्ष कृतीतून बळकटी देत या उपक्रमाने गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाईत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गिता हिंगे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितिन कोडवते, भाजपा नेत्या डॉ. चंदा कोडवते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार, डॉ. भारत खटी, अनिल पोहनकर, आकाश सातपुते, हर्षल गेडाम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मॅरेथॉन स्पर्धेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये आरोग्य, फिटनेस आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित झाले.