मुंबई
Bigg Boss 19 latest episode भारतीय टेलिव्हिजनवरचा सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' आता खऱ्या अर्थानं रंगत आला आहे. या आठवड्यातील लेटेस्ट एपिसोड प्रेक्षकांसाठी उत्कंठा, राज उघडकीस येणं, आणि नात्यांमधील कटुता घेऊन आला. एकीकडे कॅप्टन्सी टास्कसाठी स्पर्धकांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली, तर दुसरीकडे जुन्या गोष्टी उघडकीस येताच घरात कलह माजला आणि स्पर्धकांचे खरे चेहरे समोर आले.
एपिसोडची सुरुवात झाली कॅप्टन्सी टास्कच्या एलिमिनेशन राउंडने. या टास्कमध्ये सीक्रेट रूममधून नेहल चुडासमा यांनी सूत्रं हातात घेतली होती. त्यांच्या निवडीने फरहाना भट्ट आणि अशनूर कौर यांच्यात टास्कच्या नियमांवरून वाद झाला. पहिल्या राउंडमध्ये संचालक असलेल्या आवेज दरबार यांनी जीशान कादरी, बसीर अली, अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांना स्पर्धेतून बाहेर काढलं.
यानंतर स्वयंपाकघरात तान्या आणि कुनिका यांच्यात ‘घी’च्या वापरावरून मोठा वाद झाला. कुनिकाला वाटत होतं की तान्याने वैयक्तिक वापरासाठी किचनचे नियम मोडू नयेत, पण तान्या हटून बसली. ही गोष्ट नेहलला खटकली आणि पुढच्या राउंडमध्ये त्यांनी कुनिकाला चार स्पर्धकांना बाहेर काढण्याचा अधिकार दिला. त्या राउंडमध्ये प्रणीत मोरे, नीलम गिरी, मृदुल आणि शहबाज स्पर्धेतून बाहेर झाले. परिणामी, अंतिम कॅप्टन्सी रेसमध्ये आवेज, अभिषेक बजाज, कुनिका आणि गौरव खन्ना हे चार दावेदार उरले.कॅप्टन्सीचा अंतिम टास्क होता ‘मूवी नाईट्स’, ज्यात दावेदारांना काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या गेल्या आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले गेले. पण या क्लिप्समुळेच घरात खरी खळबळ उडाली.
तान्या-मृदुलमध्ये वाद
पहिल्या क्लिपमध्ये मृदुल तान्याच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना दिसला. हे पाहताच तान्या संतप्त झाली. ती म्हणाली की ती फक्त मंदिरात जाते, कुठल्याही मुलांशी संवाद ठेवत नाही, आणि ही अफवा तिच्या प्रतिष्ठेला धोका देऊ शकते. ती कोसळून रडली आणि जीशानसमोर तिचं मन मोकळं केलं. तिला भीती वाटत होती की तिचं कुटुंब या गोष्टींमुळे तिला नाकारेल.
बसीर अली विरुद्ध आवेज दरबार
दुसऱ्या क्लिपमध्ये अमाल आणि बसीर, आवेजच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा करताना दिसले. बसीरने दावा केला की आवेज मुलींना डीएम करतो आणि त्याने नागमाला फसवलं आहे. ही बाब ऐकताच आवेज भावुक झाला आणि कोसळून रडला. बसीर संतापून म्हणाला, “जितके केस याच्या डोक्यावर नाहीत, तितक्या मुली मी पटवून सोडल्या आहेत.” नंतर बसीरने कॅमेरासमोर नागमाची माफी मागितली आणि स्पष्ट केलं की ही माहिती त्याला एक कॉमन एक्सने दिली होती.
नेहलची घरात पुनः एन्ट्री
या सगळ्या गोंधळात, नेहलने घरात पुनः प्रवेश घेतला. तिने आवेजला शांत केलं, अमालला समजावलं की “दिमाग से खेलो, दिल से नहीं”, आणि अभिषेकला सांगितलं की तो खूप निगेटिव्ह दिसतो. तिने घरातील सदस्यांना तिच्या पुढच्या रणनीतींचा अंदाजही दिला.दरम्यान, गौरव खन्ना यांनी कॅप्टन्सीसाठी जीशानकडून पाठिंबा मागितला. मात्र एपिसोडच्या अखेरीपर्यंत कॅप्टन कोण होणार हे स्पष्ट झालं नव्हतं. तथापि, लाइव फीडनुसार फरहाना भट्टने गौरव खन्नाला हरवत घराची नवीन कप्तान म्हणून बाजी मारली आहे
‘बिग बॉस 19’ आता अधिकच तीव्र आणि रोचक वळणावर आला आहे. प्रेक्षकांसाठी पुढचे एपिसोड्स आणखी ट्विस्ट आणि टर्न्स घेऊन येणार यात शंका नाही.