गोठ्यावर वीज पडून म्हैस ठार

- देवरी तालुक्यातील शेडेपार येथील घटना - गोपलकाचे ५० हजाराचे नुकसान

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
गोंदिया, 
buffalo-killed-by-lightning-strike गुरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने गोठ्यात बांधलेली म्हैस जागीच ठार झाल्याची घटना देवरी तालुक्यातील शेडेपार येथे शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. काशिनाथ गुणेश्वर गायधने असे गोपालकाचे नाव असून या घटनेत त्यांची दुभती म्हैस दगावल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
 
buffalo-killed-by-lightning-strike
 
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने मुक्काम ठोकला आहे. विजेच्या कडकडाटीसह पावसाने चांलाच थैमान घातला आहे. दरम्यान, शुक्रवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यात विजेचा तांडव सुरु असताना गायधने यांच्या घराशेजारील गोठ्यावर वीज कोसळली. यावेळी गोठ्यात बांधलेली म्हैस जागीच ठार झाली. buffalo-killed-by-lightning-strike सुदैवाने इतर मोठी हानी झाली नाही. मात्र, गावात घटनेची माहिती होताच, गावकऱ्यांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून गायधने कुटुंबीयांना शासनाकडून योग्य मदत देण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणाची नासाडी...
काल, रात्रीच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले व वीजेच्या कडकडाटीसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. buffalo-killed-by-lightning-strike यावेळी वीजेमुळे पाच ते सहा घरांमधील टी.व्हि.,पंखे, बल्ब तसेच इतर विद्युत उपकरण जळून निकामी होऊन गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे.