चिखली,
Chikhali-Pathsanchalan : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला दि.२७ सप्टेंबर २०२५ ला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त चिखली नगरातील स्वयंसेवकांचे पुर्ण गणवेशात पथसंचलन दि. २७ सप्टेंबर२०२५ रोज शनिवारला सायं ५.३० ला आदर्श विद्यालय परिसरातून निघाले . पूर्ण गणवेशात पथसंचालनामध्ये जवळपास एक हजार स्वयंसेवकांनी आपली उपस्थिती दर्शविली.
पथ संचलन स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्यालय, चिखली येथून प्रारंभ होऊन स्वातंत्र्यवीर सावरकर चौक- जुनेगांव - श्री गणपती मंदिर गल्ली - चिंच परिसर-राजा टॉवर - जयस्तंभ चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - जयस्तंभ चौक - सिमेंट रोड - डॉ.हेडगेवार मार्ग - वाल्मिकी नगर मार्गे गेले व आदर्श विद्यालय येथे पथसंचलनाचा समारोप झाला.
हजारो नागरिकांनी व माता भगिनी यांनी पावसाची तमा न बाळगता विविध ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून तसेच रांगोळ्या काढून फटाके फोडून, जेसीबी द्वारे फुलाचा वर्षात करून पथसंचलनाचे उत्स्फूर्त स्वागत केले स्वयंसेवकांनी पावसाची तमा न बाळगता संचलनात मोठ्या उत्साहात भाग घेतला होता यावेळी पोलीस प्रशासनाचे, नगर परिषद प्रशासन सर्व नागरिक बंधू भगिनी यांचे सुद्धा सहकार्य लाभले