गोंदिया,
Dhakni forest : तालुक्यातील ढाकणी जंगल परिसरात ताशपत्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकून पोलिसांनी ३ लाख ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना ढाकणी जंगल परिसरात ताशपत्त्यावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जुगार अड्डयावर धाड टाकली असता पोलिसांना पाहता काहींनी पळ काढला. तर शुभम हरदिवे (२६) व रोहीत आकरे (२७) दोन्ही रा. गोंदिया यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३३०० रूपये रोख जप्त करण्यात आले. तसेच घटनास्थळावरून एक मोबाईल व पाच दुचाकी असा ३ लाख ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.