आरमोरी,
Sandeep Thakur : नैसर्गिक आपत्ती ही सांगून येत नाही असे म्हणतात, पण देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती 25 सप्टेंबरला आली. पावसामुळे रात्री घर पडला. मात्र येथील होमराज सहारे यातून बचावला असून बेघर झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर यांनी त्यांच्या घरी भेट दिली.
दोन-तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. रात्री जेवण करून टीव्हीवर कार्यक्रम पाहताना होमराज सहारे झोपी जात असताना त्यांच्या लक्षात यायच्या अगोदर घर पडला आणि घराशेजारील लोकांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यामुळे त्यांना जखमा झाल्या आणि त्यांना लगेच उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचारासाठी नेण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना घाबरलेल्या अवस्थेतून बाहेर आणल्यानंतर त्यांना घरी सुखरूप पोहचविले. त्यांची रात्रभर राहण्याची व्यवस्था घराशेजारील लोकांनी केली.
घर पडल्याची प्राथमिक माहिती आरमोरी तहसीलदारांना देण्यात आली. याबद्दल पंचक्रोशीत माहिती होताच संदीप ठाकूर यांनी भेट घेऊन त्यांनी तलाठी यांना फोन करून पंचनामा करण्यास सांगून योग्य ती मदत करण्याचे सांगितले. होमराज सहारे यांच्या उपजिविकेचे सर्व साहित्य घरात दबून खराब झाल्याने त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळले आहे. संदीप ठाकूर यांनी त्यांना धीर देत प्रशासकीय अधिकारी व सरकारकडे नुकसान भरपाईसाठी मागणी करू असे सांगितले. रामपूर चकचे तलाठी राखडे यांनी प्रत्यक्ष येऊन पंचनामा केल्यानंतर लवकरच नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
भेटी दरम्यान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, सरपंच सतीश गुरनुले, पोलिस पाटील कामिनी राऊत, मधुकर ठाकरे, रूमदेव सहारे, अशोक ठाकरे, कुश वाटगुरे, तुळशीराम ठाकरे, गोपाल पारधी, सीताराम गुरनुले, जयराम उईके, महादेव मोहर्ले, पिंकी सहारे, मोहन वाढई, पिंटू प्रधान उपस्थित होते.