दुबई,
Haris Rauf takes Dhoni-Kohli's name आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहाननं मैदानावर केलेल्या AK-47 गन स्टाइल हावभावावर आयसीसीची सुनावणी झाली. फरहानने सुनावणीत स्पष्ट केले की, हा हावभाव राजकीयदृष्ट्या प्रेरित नव्हता आणि त्याचा हेतू फक्त वैयक्तिक उत्सव होता. स्वतःच्या बचावासाठी फरहाननं उदाहरण दिलं की, माजी भारतीय कर्णधार एम.एस. धोनी आणि विराट कोहली यांनीही सामन्यात उत्सवादरम्यान अशाच प्रकारचे बंदुकीचे हावभाव केले आहेत. त्याने हे हावभाव पठाण संस्कृतीचा भाग असल्याचे सांगितले, जिथे आनंदाच्या प्रसंगी अशी हालचाल सामान्य आहे.
भारताने फरहान आणि हरिस रौफविरुद्ध या हावभावांबाबत आयसीसीकडे अधिकृत तक्रार केली होती. भारताविरुद्ध सामन्यात फरहानने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर हा हावभाव केला होता, तर रौफने विकेट घेतल्यावर "6-0" हा हावभाव केला, ज्याला अनेकांनी राजकीय संदेशाशी जोडले. सुनावणीत हरिस रौफनेही सांगितले की, "6-0" हावभाव भारताशी संबंधित नव्हता. आयसीसी अधिकाऱ्यांनीही त्याचा अर्थ स्पष्ट करू शकला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयसीसी दोन्ही पाकिस्तानी खेळाडूंना दंड ठोठावू शकते, जो सामन्याच्या फीच्या 50 ते 100 टक्क्यांपर्यंत असू शकतो. तथापि, निलंबन किंवा बंदी होण्याची शक्यता कमी आहे.गुरुवारी पाकिस्तानने दुबईमध्ये बांगलादेशवर 11 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला, आणि भारताविरुद्ध सलग पराभवानंतर 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया कप जिंकण्याचे ध्येय ठेऊन सामना खेळणार आहे.