हार्टफुलनेस तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Heartfulness Trust विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलतर्फे, हार्टफुलनेस (Purity Weaves Destiny) एज्युकेशन ट्रस्टच्या सहकार्याने “प्रेरणादायी वैयक्तिक उत्कृष्टतेचा मार्ग म्हणून ताण व्यवस्थापन” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे मार्गदर्शन हार्टफुलनेसचे प्रशिक्षक मनोज आणि संगीता जेठवा तसेच रवींद्र आणि अचला दीक्षित यांनी केले.
 

mana 
 
 
या प्रसंगी प्राचार्य डॉ. सदानंद बी. देशपांडे, उपप्राचार्य डॉ. नीलेश बोडणे आणि प्रशिक्षण-स्थापना अधिकारी डॉ. सौरभ व्ही. लवाटे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.Heartfulness Trustसर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच सुमारे ३२० विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले. आत्मसन्मान आणि भावनिक कल्याण वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने विश्रांती, ध्यान आणि माइंडफुलनेस या तंत्रांचा सराव विद्यार्थ्यांना घडवून आणण्यात आला.
सौजन्य:मनोज वैराळकर,संपर्क मित्र