घरफोडीतील सराईत गुन्हेगाराला अटक, ३ गुन्हे उघड

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
कारंजा (घा.), 
house burglary : गेल्या दोन महिन्यात कारंजा व आष्टी तालुयात झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याजवळून मुद्देमाल जप्त केला.
 
 
 
j
 
 
 
नारा येथील सुनील किनकर, बेलगाव येथील छत्रपाल चोपडे व आष्टी हद्दीतील अमोल पाटील यांचे बंद घराचे कुलूप तोडून तसेच गेल्या महिन्यात काजळी येथील सीमा टोपले यांच्या घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकम चोरून नेली होती. तक्रारीवरून गुन्हे नोंद करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर यांनी शोध पथक तयार करुन तपासाला गती दिली. पोलिस पथकाने करणसिंग जंगसिंग भादा (२५) रा. कबाडी मोहल्ला, पांढुर्णा (मध्यप्रदेश) तसेच अक्षय शेलके (१९) रा. जवाहर वार्ड, पांढर्णा (मध्यप्रदेश) यांना अटक केली. करणसिंग भादा याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली विनाक्रमांकाची दुचाकी व चोरीस गेलेला एक सोन्याचा गोफ, सोन्याची गरसोळी, सोन्याचे पदक, सोन्याचे कानातील झुमके, सोन्याच्या ४ आंगठ्या, ५ तोळ्याची चांदीची पायल व रोख ७० हजार रुपये असा २ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले व ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सतीश जायभाये, नितेश मैंदपवार, लिलाधर उरकंडे, निलेश पेटकर, दिनेश घसाड, अमोल मानमोडे, रितेश चौधरी, होमगार्ड विनोद वासनकार, अक्षय नरसिंगकार, खुशाल नेहारे व फैजान शेख यांनी केली.