अनिल कांबळे
नागपूर,
Sudhakar Adabale : विविध मागण्यांसाठी निप्पान कंपनीविराेधात शेतकऱ्यांनी आंदाेलन केले. या आंदाेलनाला कारणीभूत धरून आमदार सुधाकर अडबाले यांच्याविरूध्द पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने भद्रावती पाेलिसांना नाेटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पाेलिस स्टेशन हद्दीतील आवारी सिमेंट प्लांट तर तेलवासा इथे निप्पाॅन डेनराे या कंपनीच्या विराेधात आंदाेलन करण्याकरिता बरेच शेतकरी फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाले हाेते. त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आमदार सुधाकर अडबाले बैठकीला हजर झाले हाेते. यावेळी कार्यकर्त्यांनी कंपनीच्या मालकीच्या संपत्तीचे नुकसान केले. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाला अश्लील शिवीगाळ केली व त्यांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सुरक्षारक्षकाने भद्रावती पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यामध्ये आ. सुधाकर अडबाले यांनी आराेपींना प्राेत्साहन दिले, असा आराेप करण्यात आला.
त्यामुळे त्यांच्याविरुद्धसुद्धा भद्रावती पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हा नाेंदविण्यात आला. परंतु दाखल गुन्हा हा बेकायदेशीररित्या नाेंदविल्या गेल्यामुळे व आ. अडबाले यांनी काेणतेही गैर कृत्य केलेले नसून ते केवळ कार्यकर्त्यांनी बाेलावलेल्या बैठकीला हजर झाले. त्यांच्याविरुद्ध फौजदारी प्रकरण चालू शकत नाही तसेच त्यांच्याविरुद्ध नाेंदविण्यात आलेला गुन्हा हा बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यात यावा, याकरिता त्यांनी अॅड. अनिल ढवस यांच्यार्माफत उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने प्रारंभिक सुनावणीत राज्यसरकारसह भद्रावती पाेलिसांना नाेटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत.
मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
निप्पान डेनराे या कंपनी विराेधात येथील बरेच शेतकरी आंदाेलन करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतु मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरी कंपनीच्या विराेधात आंदाेलने तसेच धरणे देत असतात. या विषयाच्या अनुषंगाने हायकाेर्टात सुद्धा याचिका प्रलंबित आहे. आ. सुधाकर अडबाले यांच्यार्ते अॅड.अनिल ढवस, सरकारर्ते एच. एन. प्रभू यांनी बाजू मांडली.