बुलढाणा,
Vijayraj Shinde : युवा ही देशाची संपत्ती असून नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले विकसित भारत व विश्वगुरू बनण्याचे भारताचे स्वप्न साकार करण्याची ताकद ही युवा मध्ये आहे,नशा मुक्त ,आत्मनिर्भर भारत,विकसित भारत, सुजलाम सुफलाम भारत असा नवभारत निर्मितीचा संकल्प आज पावसात धावणार्या तरुणाईने दाखवून दिलेला आहे असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देताना केले.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत आहे. दि २७ सप्टेंबर बुलढाणा येथे भाजपा जिल्हा कार्यालय शिवालय येथून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने नमो युवा मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी उपस्थित राहून हिरवी झेंडी दाखविली व रॅलीला सुरुवात केली.
मॅरेथॉनमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील युवक, युवती, प्रौढ व चिमुकल्यांनी पावसाचे वातावरण असून देखील कमालीचा सहभाग नोंदविला होता. रॅली शिवालयापासून - संगम चौक- जयस्तंभ चौक, जनता चौक- कारंजा चौक- सोसायटी पंप- चिंचोले चौक- गजानन महाराज मंदिर येथे मार्गक्रमण करीत पुन्हा शिवालय येथे रॅली चा समारोप करण्यात आला. यावेळी भर पावसात सळसळत्या तरुणाईचा उत्साह हा पाहण्यासारखा होता.
मॅरेथॉन मध्ये पुरुष गटातून (५ किमी)प्रथम क्रमांक आकाश बारवाल , दुसरा वैभव बरडे , तिसरा सागर राजपूत , चौथा गौरव भराड, पाचवा शुभम मुलांडे यांनी क्रमांक पटकाविला. तर युवती गटातून (३ किमी) प्रथम क्रमांक गौरी राठोड, दुसरा नेहा जाधव, तिसरा प्रगती राऊत, चौथा स्वप्न सोनूने, तर पाचवा अवनी बोरकर यांनी क्रमांक पटकाविला. युवक व युवती दोन्ही गटासाठी पहिल्या पाच स्पर्धकांना अनुक्रमे रु ५००१, रु ३००१, रु २००१, रु १००१, रु ७०१ रुपयांचे पारितोषिक, ट्रॉफी व मेडल देऊन जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.
रॅलीसाठी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ माळी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संतोष काळे, बुलढाणा ग्रा. अध्यक्ष सतीश भाकरे, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष अकिल मोहम्मद, माजी सैनिक सेल जिल्हा संयोजक अभिमन्यु करपे, जेष्ठ नेते विश्राम पवार, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे,जिल्हा सचिव डॉ मधुसूदन सावळे, जिल्हा सचिव गणेशसिंग राजपूत, जिल्हा सचिव कृष्णा सपकाळ, किरण नाईक, अजित गुळवे, सुभेदार सिद्धेश्वर पडोळ, मुकुंदा देशपांडे, ऍड दशरथसिंग राजपूत, प्रदीप सोनटक्के, भाजयुमो जिल्हा सचिव नितीन उगले, वैभव घाटे, आशिष देशमुख, संगीत आनलकर, सागर पाटील, नीरज गायकवाड, बंडू अंभोरे, आशिष देशमुख , सुहास राठोड, पवन रदाळ ,वैभव घुटे , गणेश काटकर, ऋषिकेश कानडजे, सागर पाटील ,कार्तिक राजपूत, घनश्याम बिबे यांसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग,विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व स्पर्धकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रॅलीच्या समाप्तीनंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्या समवेत स्वच्छता अभियान राबवून परिसराची स्वच्छता केली.