नागपूर,
Nationalist Tukadoji महात्मा गांधी जयंती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतीदिन या दोन महापुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, त्यांच्या विचारांचा प्रसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्हावा या उद्देशाने “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीयगीत समूहगान स्पर्धा” ६ ऑक्टोबर सोमवार रोजी आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा सर्वोदय आश्रम, विनोबा विचार केंद्र, भोले पेट्रोलपंपाजवळ, सिव्हील लाईन, नागपूर येथे होणार असून तिचे आयोजन सर्वोदय आश्रम आणि श्रीगुरूदेव युवामंच यांनी संयुक्तपणे केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रीयगीतं तसेच महात्मा गांधींवरील स्मृतीगीतं प्रसिद्ध आहेत. स्पर्धेसाठी सहभागी महाविद्यालयीन चमूंना या गीतांपैकी एक गीत सादर करावे लागेल.Nationalist Tukadoji नियमावलीनुसार स्पर्धा पार पडेल आणि विजयी चमूंना पुरस्कार प्रदान केले जातील.विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन गांधीजी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, तसेच सर्वोदय आश्रमाचे ॲड. वंदन गडकरी, रवी गुडधे आणि वंदना वनकर यांनी केले आहे.
सौजन्य:ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र