‘श्री नरकेसरी’ आणि तरुण भारत हे जाज्वल्य राष्ट्रभक्तीच्या इतिहासाचे साक्षीदार!

- नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार - श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अमृत महोत्सवाची सांगता

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Nitin Gadkari : श्री नरकेसरी प्रकाशन संस्था आणि या संस्थेर्ते संचालित दै. तरुण भारत हे दाेन्ही जाज्ज्वल्य राष्ट्रभक्तीच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत, असे गाैरवाेद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे काढले. श्री नरकेसरी संस्थेने तरुण भारतच्या माध्यमातून वाचकांना दिलेले वैचारिक अग्रलेख, लेख, वार्तापत्रे, बातम्या या सर्वांतून लाेकांच्या मनावर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. या संस्थांच्या संस्कारातून अनेक कार्यकर्ते घडले. आजही त्यांचे समाज प्रबाेधनाचे व राष्ट्राेत्थानाचे व्रत सुरू असल्याचा आनंद वाटताे, असेही ते म्हणाले.
 
 

tarun bharat 
 
 
 
श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अमृत महाेत्सवाच्या सांगतेनिमित्त निर्मिलेल्या ‘अमृतयाेग’ विशेषांकाचे प्रकाशन आज (27 सप्टेंबर) राेजी वनामती सभागृहात अत्यंत थाटात झाले. श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डाॅ. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, संचालक मंडळातील सदस्य उदयभास्कर नायर, समीर गाैतम, आशीष बडगे, अशाेक मानकर, मीरा कडबे, श्रीकर साेमण, प्रदीप काळेले, संदीप पाेशट्टीवार आणि दै. तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित हाेते. नितीन गडकरी म्हणाले की, श्री नरकेसरी प्रकाशन संस्था हा एक जिवंत इतिहास आहे आणि तरुण भारत हा अनेक पिढ्यांना राष्ट्रभक्तीचा विचार आणि प्रेरणा देणारा फार माेठा स्त्राेत आहे. या संस्थांना संघर्षाचा, बलिदानाचा, अनेक संकटांशी केलेल्या सामन्याचा इतिहास आहे.
 
 
स्वातंत्र्यपूर्व काळातील लाेकाेत्तर नेते नरकेसरी बॅरिस्टर माेराेपंत अभ्यंकर यांनी 1926 मध्ये साप्ताहिकाच्या स्वरुपात तरुण भारतची सुरुवात केली. पुढील काळात त्याचे दैनिकात रुपांतर झाले. दैनिक म्हणून ते सर्वांगीण स्वरुपात वर्धिष्णू करण्यात श्री. बाळासाहेब देवरस यांचे माेलाचे याेगदान हाेते. बाळासाहेबांनी या संस्थेचे पालन, पाेषण आणि संवर्धन केले. त्यांच्या नेतृत्वाचा परिस स्पर्श झालेली ही संस्था आजही त्यांच्या आशीर्वादाने तसेच त्यांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करीत आहे, असा अभिप्राय त्यांनी दिला. या दैनिकाची वाचकप्रियता वाढवण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका संस्थापक संपादक ग. त्र्यं. उपाख्य भाऊसाहेब माडखाेलकर यांची हाेती. आजही तरुण भारताची खरी ओळख भाऊसाहेबांच्याच नावाने आहे. माडखाेलकरांनी दिलेला भक्कम वैचारिक वारसा त्यांच्या नंतरच्या सर्व संपादकांनी जपला ही समाधानाची बाब आहे. त्या काळी आणि आजही तरुण भारतचे अग्रलेख दर्जेदार असतात, अशी प्रशंसाही त्यांनी केली. दै. तरुण भारतवर दाेन माेठी संकटे आली. गांधीजींच्या हत्येनंतर जे संकट आले, ते फार माेठे हाेते. त्या काळात तरुण भारतचे माेठे नुकसान झाले.
 
 
दुसरे संकट 1975 मध्ये आणिबाणी लादली गेली तेव्हा आले. त्यावेळी सेंसाॅरशिपचा सामना या संस्थेला करावा लागला, असे सांगून गडकरी म्हणाले की, संघर्षाचा काळ असतानाही श्री नरकेसरी संस्था आणि तरुण भारतने राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे ध्येय व वैचारिक अधिष्ठानाशी तडजाेड केली नाही. त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा ज्वलंत इतिहास आहे. आणिबाणीच्या काळात लाेकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा माेठा संघर्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झाला, त्यात तरुण भारतची भूमिका अतिशय महत्त्वाची हाेती, असेही त्यांनी सांगितले.वैचारिक अधिष्ठान असलेल्या संस्थांना व्यावसायिक यश मिळवणे कठीण असते. पण, तरुण भारतने काळाची गरज म्हणून कधीही आपला विचार साेडला नाही. या संस्थेने व्रतस्थ पत्रकारितेचा स्वीकार केला आणि तरीही व्यावसायिकदृष्ट्या ही संस्था यशस्वी ठरल्याचा आपल्याला आनंद असल्याचेही ते म्हणाले.
 
 
वैचारिकता टिकवतानाही व्यावसायिकदृष्ट्या संस्थेला उत्तम यश मिळवून दिल्याबद्दल समस्त पदाधिकारी तसेच संचालक मंडळाचे त्यांनी काैतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रबंध संचालक धनंजय बापट म्हणाले की, श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेस आज 75 वर्षे पूर्ण झाली. संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित हाेणाèया तरुण भारत या दैनिकाची यंदा शताब्दी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आपल्या सर्वांची मातृसंस्था आज तारखेनुसार 100 वर्षे पूर्ण करीत आहे. आजच्या दिवशी हा ऐतिहासिक साेहळा साजरा करता आला हा खराेखरच भाग्याचा याेग आहे.बापट म्हणाले की, आजचा हा प्रसंग म्हणजे केवळ याेगायाेग नाही. ताे 75 वर्षांतील अनेकांच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा, परिश्रमाचा, विपरीत परिस्थितीत टिकून राहण्याचा प्रवास आहे. ‘न मे कर्मफले स्पृहा’ हे आमचे ब्रीद आहे.
 
 
कर्माचे फळ मिळावे, याची अपेक्षा आम्ही कधीही केली नाही. आम्ही कर्मयाेगावर विश्वास ठेवताे. आमची बांधिलकी विचारांशी आहे, असे सांगताना त्यांनी जुन्या काळापासून आजपर्यंत संस्थेसाठी याेगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा आवर्जून उल्लेख केला. प्रारंभी नितीन गडकरी तसेच व्यासपीठावरील मान्यवरांसह श्रीमती माडखाेलकर, इंद्रनील माडखाेलकर, धनंजय अभ्यंकर आदींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. नरकेसरी बॅरिस्टर अभ्यंकर व संस्थापक संपादक भाऊसाहेब माडखाेलकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी अभिवादन केले. संचालन प्रगती किडे यांनी केले. शैलेश पांडे यांनी अमृतयाेगची भूमिका मांडली तसेच आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी वृंदा पांडे यांनी पसायदान गायिले.
 
 
प्रबंध संचालकांचे काैतुकतरुण भारतचा ताळेबंद कधीही नफ्यात येऊ शकत नाही, असे माझे ठाम मत हाेते. पण, विद्यमान प्रबंध संचालक धनंजय बापट यांनी तरुण भारतला नफ्यात आणून दाखविले, अशा शब्दांत गडकरी यांनी बापट यांच्या कार्याची प्रशंसा केली.
 
 
मुखपृष्ठ प्रदर्शनातून उलगडला‘तरुण भारत’चा इतिहास
 
 
श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचा यंदा अमृत महाेत्सव आणि या संस्थेर्ते संचालित दै. तरुण भारतची यंदा शताब्दी. रा. स्व. संघाच्या शताब्दी पर्वावर आलेल्या या याेगाच्या पृष्ठभूमीवर श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अमृत महाेत्सवाचा सांगता साेहळा संपन्न झाला. या निमित्ताने तरुण भारतच्या दुर्मिळ मुखपृष्ठांचे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी लावण्यात आले हाेते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थितांना श्री नरकेसरी आणि तरुण भारत यांच्या देदीप्यमान इतिहासाचा नव्याने परिचय झाला. रा. स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लाेया आणि आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते मुखपृष्ठांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. 1944 पासूनच्या दुर्मिळ अंकांची मुखपृष्ठे, तेवढीच दुर्मिळ छायाचित्रे, त्या काळचे मथळे, मांडणी, तत्कालीन ज्वलंत विषयांवरील संपादकीय भाष्य हे सारे पाहून सगळेच हरखून गेले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रदर्शनातील मुखपृष्ठे पाहिली. पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनीही आवर्जून प्रदर्शनाला भेट दिली व संस्थेला शुभेच्छा दिल्या. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देखील या प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाचे काैतुक केले.
 
 
कृष्णराव गाेखले, अनिरुद्ध पांडे यांना जीवनगाैरव पुरस्कार प्रदान
 
 
नागपूरः जुनी-जाणती माणसं हीच संस्थेची संपत्ती असते. श्री नरकेसरी संस्थेच्या अमृत महाेत्सव सांगता साेहळ्यानिमित्त आयाेजिलेल्या अमृतयाेग विशेषांकाच्या प्रकाशन साेहळ्यात तरुण भारतच्या वाटचालीत माेलाचे याेगदान देणारे कृष्णराव गाेखले आणि अनिरुद्ध पांडे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जीवनगाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप हाेते. 92 वर्षांचे कृष्णराव गाेखले हे श्री नरकेसरी प्रकाशनचे सर्वांत ज्येष्ठ भागधारक आहेत. मूळचे यवतमाळकर असलेले गाेखले हे सध्या पुण्याला वास्तव्यास असून, या साेहळ्यासाठी विशेषत्वाने आले हाेते. यवतमाळचे जिल्हा प्रतिनिधी असलेले अनिरुद्ध पांडे यांनी तब्बल 50 वर्षे निष्ठेने श्री नरकेसरी संस्था आणि तरुण भारतला सेवा दिली. निष्ठावान कर्मचाऱ्याची भूमिका त्यांनी निभावली. 2018 मध्ये सेवानिवृत्त झाले असले तरी ते आजही संस्थेला सेवा देत आहेत. त्यांच्या या याेगदानाबद्दल त्यांचाही याप्रसंगी गाैरव करण्यात आला.