इस्लामाबाद.
Will PoK become independent पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाची तीव्रता प्रचंड वाढली असून परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. नागरिकांनी सैन्याविरोधात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बंड पुकारलं आहे. "सहन नाही करणार, आमचा हक्क मिळवणार" अशा घोषणांनी रस्ते दणाणून गेले आहेत. या जनआंदोलनाचे नेतृत्व ‘जॉईंट आवामी कमिटी’ करत असून, त्यांनी 29 सप्टेंबर रोजी संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. नागरिकांच्या मुख्य मागण्या म्हणजे गरिबी, बेरोजगारी, अन्नसाठ्याची कमतरता, आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य.

मात्र या उठावाला चिरडण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी PoK ला "बूट-बुलेट"च्या हवाली केल्याचा आरोप होत आहे. संवेदनशील भागांमध्ये लष्करी व निमलष्करी तुकड्या मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक नेत्यांना अटक करण्यात आली असून, Will PoK become independent हिंसक निदर्शनांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत. PoK मध्ये जनता इतकी त्रस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे की, त्यांच्या हाताशी ना काम आहे, ना कमाईचे साधन, अन्नसाठा संपला आहे, उपचारांची कोणतीही सोय नाही आणि स्वातंत्र्य तर दूरचं स्वप्न आहे. याच कारणामुळे आंदोलन पेट घेत आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये पुढील 48 तासांत काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा आहे. PoK मधील जनतेनं थेट सरकारविरोधात युद्धाची भाषा सुरू केल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सध्या तरी संपूर्ण पाकिस्तानचं लक्ष या आंदोलनावर खिळलं असून, PoK मध्ये पुढील काही तासांत नेमकं काय घडणार, याकडे जगभरातील अभ्यासक व धोरणकर्त्यांचंही बारकाईनं लक्ष लागलं आहे.